शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस अध्यक्षपद प्रियांका गांधींकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 04:24 IST

काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्याने त्यांच्या जागी अध्यक्षपदी कोणाची निवड करावी, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांत अद्याप सार्वमत झालेले नाही.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्याने त्यांच्या जागी अध्यक्षपदी कोणाची निवड करावी, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांत अद्याप सार्वमत झालेले नाही. त्यामुळे अनिश्चितता निर्माण झालेली असताना अध्यक्षपदाची धुरा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याकडे द्यावी, अशी कुजबुज सुरू झाली आहे.तथापि, काँग्रेस नेत्यांनी उघडपणे त्यांच्या नावाचा पुरस्कार केलेला नाही. कारण अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम राहत राहुल गांधी यांनी २५ मे रोजीच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट केले होते की, काँग्रेस पक्षाने गांधी कुटुंबातील व्यक्तीऐवजी अध्यक्षपदासाठी दुसरी व्यक्ती शोधावी.तीनदा लोकसभचे खासदार राहिलेले भक्त चरण दास यांनी म्हटले की, तळागाळापासून ते वरिष्ठ पदावरील काँग्रेस पक्षाचे लाखो नेते काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्याची मागणी करतील. ते मागणी करीत आहेत; परंतु त्यांची मागणी योग्य ठिकाणी पोहोचत नाही; परंतु सर्वांची हीच इच्छा आहे. प्रियांका गांधी यांच्यासोबत एक प्रभावशाली आणि विश्वसनीय नेतेही असावेत. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागे न घेतल्यास प्रियांका गांधी यांना पक्षाध्यक्ष केले जावे अािण पक्षाचे त्यांचे नाव सुचवावे, असे दास यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.त्या योग्य पर्याय असतील, असे मला वाटते. राहुल गांधी आमच्या कुटुंबियातील व्यक्तीऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा विचार करावा, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असल्याने लोक प्रियांका गांधी यांचे नाव जाहीरपणे पुढे करण्यास कचरत आहेत, असे जायस्वाल यांनी म्हटले आहे.पक्ष सूत्रानुसार या आठवड्यात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता नाही. सार्वमत होत नसल्याच्या स्थितीत काँग्रेस कार्यकारिणी राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकृत करील आणि त्यांचा उत्तराधिकार निवडण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यांच्या प्रभारींना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील, असे सूत्रांनी सांगितले.>अध्यक्ष नव्या पीढीतीलच हवा - दासवय आणि लोकप्रियता हा घटक आहेच. भावी अध्यक्ष जास्त वयाचा नसावा. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्याप्रमाणे खूप मेहनत घेणारा असावा. त्यादृष्टीने ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट यांच्याकडे पाहिले जाते, असे दास यांनी म्हटले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस