शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Congress President Election: राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत; 'या' गोष्टीवरुन झाले स्पष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 18:54 IST

Congress President: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

Congress President Election:काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Congress President Election) प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार, याबाबतचा सस्पेंस अनेक दिवसांपासून कायम आहे. अनेक राज्यातील काँग्रेस कमिट्यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी करणारा ठराव संमत केला आहे. मात्र, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या मध्यावरून परतणार नाहीत. सध्या पदयात्रा केरळमध्ये आहे. 23 रोजी थोडा ब्रेक घेऊन 29 रोजी यात्रा कर्नाटकात दाखल होणार आहे. काँग्रेसचा हा प्रवास 150 दिवसांत पूर्ण होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. नामनिर्देशनासाठी उमेदवाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे. अशा स्थितीत सर्व राज्य समित्यांचा प्रस्ताव असूनही राहुल गांधी अध्यक्षपदासाठी उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक राज्यांनी मंजूर केला प्रस्ताव जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासह काँग्रेसच्या अनेक राज्यांनी राहुल गांधींना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे येत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेदेखील निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. आज काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना निवडणूक लढविण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ज्यावर ते म्हणाले होते की, 'मी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही. माझ्या मनात कोणताही संभ्रम नाही.' दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीबाबत अधिसूचना जारी होणार आहे. 24 ते 30 सप्टेंबर या कालावधीत नावनोंदणी प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस