शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Congress President Election: 'बकरीद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे', मल्लिकार्जुन खर्गेंच्या विधानावर भाजपचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 20:42 IST

Congress President Election: काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? या प्रश्नावर खर्गेंनी दिलेले उत्तर चर्चेत आहे.

Congress President Election:काँग्रेसचे पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे सध्या विविध राज्यात दौरे करुन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. बुधवारी खर्गे भोपाळमध्ये होते, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पत्रकारांनी विचारले की, येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? त्यावर ते म्हणाले की, 'बकरीदमध्ये टिकलात तर मोहरममध्ये नाचाल'(बकरीद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे).

खर्गेंच्या विधानावर भाजपचा आक्षेपखर्गेंच्या वक्तव्यावरून राजकारण सुरू झाले आहे. भाजपने त्यांच्यावर मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप केला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले - काँग्रेस परिवाराने निवडलेल्या पहिल्या प्रॉक्सी अध्यक्ष उमेदवाराला 2024 मध्ये काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असेल, असे विचारण्यात आले होते. यावर त्याचे उत्तर होते, "बकरीदमध्ये टिकलात तर मोहरममध्ये नाचाल. पण, मोहरम हा उत्सव नसून शोक आहे. हा मुस्लिमांचा मोठा अपमान आहे,'' अशी टीका त्यांनी केली.

'काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक होते'खर्गे म्हणाले की, 'काँग्रेस पक्षाने अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काँग्रेस हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे, जिथे पक्षाच्या अध्यक्षाची निवड कार्यकर्त्यांकडून लोकशाही पद्धतीने केली जाते. या निवडणुकीत उमेदवार म्हणून मला तुमच्या मताची आणि पाठिंब्याची अपेक्षा आहे. इंदिरा गांधी यांच्या हस्ते संस्थेत पहिल्यांदाच पद बहाल करण्यात आले. विद्यार्थी नेत्यापासून ते राज्यसभेतील LoP पर्यंतचा माझा प्रवास आहे. काँग्रेसने माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे. आज मी पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असल्याने तुमचा पाठिंबा मागतो आहे. तुमच्या विश्वासाने मी माझ्या क्षमतेनुसार पक्षाची सेवा करत राहीन,' असे ते म्हणाले.

17 ऑक्टोबरला मतदान, 19 रोजी निकाल लागेलराष्ट्रपती निवडीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय निवडणूक प्राधिकरण या मतदानावर देखरेख करत आहे. 8 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. आता पक्षाध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर निवडणुकीचा निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधी