शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Congress President: काँग्रेसमध्ये नवा ट्विस्ट; शशी थरुर होऊ शकतात पक्षाचे अध्यक्ष, सोनिया गांधींचा हिरवा कंदील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 20:43 IST

Congress President: शशी थरुर यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली, या भेटीनंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

Congress President: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. राहुल गांधी (Rahul Ganhdi) यांनी अध्यक्ष होण्यासाठी स्पष्टपणे नकार दिल्यानंतर अनेक नेत्यांची नावे समोर आली होती. एकीकडे राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी अनेक राज्यात ठराव मंजूर केले जात आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

राहुल गांधींचा नकार2017 साली राहुल गांधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते, पण भाजपकडून 2019 मध्ये मिळालेल्या पराभवानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) पक्षाच्या हंगामी अध्यक्ष झाल्या. आता काँग्रेसमध्ये निवडणुकीतून पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे, याची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. राहुल यांनी पक्षाध्यक्ष होण्यास नकार दिल्यानंतर अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली. यातच आता शशी थरुर यांचेही नाव चर्चेत आले आहे.

सोनिया गांधींच्या भेटीनंतर चर्चांना उधाणपरदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर आज शशी थरूर यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेतेही उपस्थित होते. या भेटीनंतर शशी थरुर पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वतः सोनिया गांधी यांनीच थरुर यांना निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दाखवल्याची माहिती मीडिया रिपोर्टसमध्ये करण्यात येत आहे. एएनआयनेही सूत्र्यांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.  त्यामुळे आता शशी थरुर पक्षाध्यक्ष होतात का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस