शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये काँग्रेसने खेळले ओबीसी कार्ड, प्रदेशाध्यक्षपदी जगदीश ठाकोर यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 08:06 IST

Congress News: गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत ओबीसी (२५ टक्के) आणि आदिवासी (१५ टक्के) हे समीकरण  सत्तारुढ भाजपविरुद्ध प्रभावी ठरेल, असा विचार करून काँग्रेसने गुजरात प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी ओबीसी समुदायाचे जगदीश ठाकोर यांची नियुक्ती केली.

- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत ओबीसी (२५ टक्के) आणि आदिवासी (१५ टक्के) हे समीकरण  सत्तारुढ भाजपविरुद्ध प्रभावी ठरेल, असा विचार करून काँग्रेसने गुजरात प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी ओबीसी समुदायाचे जगदीश ठाकोर यांची नियुक्ती केली. भाजपच्या पटेल कार्डला अटकाव घालण्यासाठी काँग्रेसने  गुजरातमध्ये ओबीसी कार्ड खेळले आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ओबीसी नेते जगदीश ठाकोर यांंची गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेतेपद आदिवासी समुदायाच्या व्यक्तीला दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी ठाकोर यांच्या नियुक्तीने गुजरातमधील काँग्रेस नेते खूश आहेत; परंतु,  ठाकोर यांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी  काँग्रेसला उभारी देण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असेही या नेत्यांना वाटते. ठाकोर हे उत्तर गुजरातचे आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नवीन नेता सौराष्ट्रमधील असेल.  ज्येष्ठ आणि नवीन नेत्यांना एकत्र आणण्यास ही नवीन टीम यशस्वी ठरली, तर आगामी निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पार्टीविरुद्ध अटीतटीची लढत ठरेल.

 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण