शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज - ज्योतिरादित्य शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 04:15 IST

मला कोणाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया द्यायची नाही, मात्र काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, यात कुठलीच शंका नाही, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र व हरयाणा या दोन प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसवर आपल्याच नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विविध वक्तव्यांचा सामना करण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पक्षावरील संकट आणखी वाढले असून आमचे नेते सोडून गेले हीच पक्षासमोरील मोठी समस्या असल्याचे म्हटल्यानंतर आता काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे म्हणत घरचा आहेर दिला आहे.मला कोणाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया द्यायची नाही, मात्र काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, यात कुठलीच शंका नाही, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर ज्योतिरादित्य शिंदे पक्षातील अंतर्गत मतभेदांवरून नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले होते. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता.सलमान खुर्शीद यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून पक्ष अद्याप बाहेर पडला नसल्याचे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. खुर्शीद म्हणाले होते की, आम्ही पराभवाचे एकत्रित विश्लेषण करू शकलो नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षापासून दूर गेले हे आमच्यासमोरील मोठं संकट आहे. राहुल गांधी यांच्यावर आताही पक्षाचा विश्वास आहे.या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्रातही काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षातील मतभेदांबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक प्रचारापासून निरुपम यांनी स्वत:ला दूरच ठेवले आहे. आपली नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. तिकडे हरयाणामध्येही चित्र असेच आहे. अनेक वर्षे सक्रियपणे काम केलेल्या अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस