शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना पप्पू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याची पक्षातून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 09:21 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणं राजस्थानमधील काँग्रेस नेत्याच्या अंगलट आलं आहे.

जयपूर- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणं राजस्थानमधील काँग्रेस नेत्याच्या अंगलट आलं आहे. पक्षाने त्या नेत्याचं सदस्यत्व रद्द केलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानच्या युथ काँग्रेसचे महासचिव ब्रम्हप्रकाश बिश्नोई  यांनी राहुल गांधींना त्यांच्या व्हॉट्अॅपवर पप्पू म्हटलं. ब्रम्हप्रकाश बिश्नोई  केशव चंद्र यादव यांना राजस्थानच्या युथ काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याच्या निर्णयावर नाराज होते. या निर्णयावरील नाराजी व्यक्त करण्यासाठी बिष्णोई यांनी ग्रुपमध्ये मेसेज केला की, आता समजलं राहुल गांधींना पप्पू का म्हणतात?

त्याच ग्रुपमध्ये युथ काँग्रेसचे प्रभारी देवेंद्र कादयानसुद्धा सहभागी होते.  बिश्नोई यांचा हा मेसेज लगेच व्हायरल झाला. त्यानंतर सोमवारी (ता.१४मे) संध्याकाळी बिश्नोई यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. बिश्नोई यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा अपमान केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे पक्षाने म्हटलं आहे.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केशवचंद्र यादव यांना युथ काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आलं होतं. राज्यात युथ काँग्रेसला मजबुत करण्यासाठी राहुल गांधी यांनी यादव यांची निवड केली होती. राहुल गांधी यांनी हा निर्णय पक्षातील तरुणांना जोडण्यासाठी व व्होटबँक मजबूत करण्यासाठी घेतला होता. यादव यांनी यापूर्वी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना, भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहिलं आहं. बिश्नोई हे काँग्रेसचे नेते अशोक चांदना यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येते. चांदना यांना अध्यक्षपदाची संधी न दिल्याने ते खूप नाराज होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस