शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"जमिनीला कोणताही धर्म नसतो, हे सर्व सामाजिक...", वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शशी थरूरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 15:38 IST

shashi tharoor on wakf act : सामाजिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा, लव्ह जिहाद आणि लँड जिहाद यासंबंधीचे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासंबंधीचे विधेयक अद्याप कार्यसूचीत नाही, मात्र हे विधेयक आणले तर ते घटनात्मक आहे की नाही, हे पाहावे लागेल. तसेच, सामाजिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, जमिनीला कोणताही धर्म नसतो. सामाजिक वातावरण बिघडवण्यासाठी हे सर्व केले जात आहे, आम्ही हे प्रकरण न्यायालयात नेणार आहोत. हे न्यायालयात टिकणार नाही, असे म्हणत शशी थरूर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार येत्या काही दिवसांत वक्फ बोर्डाच्या अधिकारात आणि त्याच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोदी सरकारला वक्फ बोर्डाच्या कोणत्याही मालमत्तेला 'वक्फ मालमत्ता' करण्याचे अधिकार रोखायचे आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शुक्रवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाने वक्फ कायद्यात जवळपास ४० सुधारणांना मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक ५ ऑगस्ट रोजी संसदेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाचे अधिकार कमी होतील.

बांगलादेशातील सद्यस्थितीबाबतही शशी थरूर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "मला वाटते की परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. मी जे काही मीडियातून ऐकत आहे, ते खूप चिंताजनक आहे. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही गंभीर चिंता आहे. ही अंतर्गत बाब असली, तरी आम्ही प्रार्थना करतो की लवकरच तोडगा निघावा आणि शांतता राहावी. बांगलादेश हा आपला शेजारी देश आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येकाला तिथे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित झालेली पहायची आहे."

वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा विधेयक काय असेल? मोदी सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रमुख सुधारणांमध्ये वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना बदलणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डांच्या संरचनेत बदल करण्यासाठी वक्फ कायद्याच्या कलम ९ आणि कलम १४ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव विधेयकात असल्याचे सांगण्यात आले आहे. मोदी सरकारच्या विधेयकात राज्य वक्फ बोर्डांनी दावा केलेल्या वादग्रस्त जमिनीची नव्याने पडताळणी करण्याची मागणीही प्रस्तावित आहे. या विधेयकांतर्गत वक्फ बोर्डाने दावा केलेल्या मालमत्तेची सक्तीने पडताळणी केली जाईल.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूर