शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 06:09 IST

या गैरप्रकारात निवडणूक आयोगातील जे लोक सामील आहेत, त्यांनी देशद्रोह केला असून, शोधून काढून कारवाई करायला भाग पाडू. त्यांना कदापिही माफ केले जाणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने भाजपसाठी मतांची चोरी केली असून, त्याबाबत काँग्रेसकडे ॲटमबॉम्ब ठरू शकतील, असे भक्कम पुरावे आहेत असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. हे पुरावे उजेडात आल्यावर निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा राहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या गैरप्रकारात निवडणूक आयोगातील जे लोक सामील आहेत, त्यांनी देशद्रोह केला असून, त्यांना कदापिही माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बिहारमधील मतदारयादीचा मसुदा शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. ही यादी त्या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेनंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मोहिमेवर विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत तीव्र आक्षेप घेतला आहे. 

‘गैरकृत्य करणाऱ्यांना शिक्षा होणारच’

राहुल यांनी सांगितले की, निवडणूक आयोगात गैरकृत्ये करणारे हे देशाच्या विरोधात काम करत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्की आहे. कोणी निवृत्त झाले असतील, सध्या ते कुठेही राहात असतील, त्यांना शोधून कारवाई करण्यास आम्ही भाग पाडू. राहुल गांधी कर्नाटकमधील मतदारयाद्यांतील गोंधळ ५ ऑगस्ट रोजी उघड करणार आहेत.

बिनबुडाच्या आरोपांकडे लक्ष देऊ नका : आयोग

निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करत आहे हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांकडे लक्ष देऊ नका, असे आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी सांगितले. दररोज केले जाणाऱ्या अशा बिनबुडाच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही.  कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना न जुमानता सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने आपले काम करत राहावे, असे आदेश आयोगाने दिले आहेत. राहुल यांनी आयोगाला कधीही कोणतेही पत्र लिहिले नाही, असेही आयोगाने म्हटले. 

 

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसVotingमतदानElectionनिवडणूक 2024