शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतीय संकल्पने’चीच हत्या झाली; राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 05:20 IST

खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी हे प्रथमच आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.

वायनाड (केरळ) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मणिपूर हिंसाचारावर संसदेत झालेल्या चर्चेत पंतप्रधान २ तासांपेक्षा अधिक वेळ बोलले, पण त्यांनी ईशान्येतील या राज्याच्या समस्येवर कोणताही तोडगा काढला नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले. 

खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी हे प्रथमच आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) कलपेट्टा येथे त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘ते (पंतप्रधान) २ तास १३ मिनिटे बोलले. ते हसले... त्यांनी विनोद केले... मस्करी केली, त्यांच्या मंत्र्यांनीही हास्यविनोद केले. त्यांनी खूप गंमती-जमती केल्या. पंतप्रधान २ तासांच्या भाषणात प्रत्येक विषयावर बोलले... काँग्रेसवर, माझ्यावर, विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’वर ते  विस्ताराने बोलले; पण मणिपूरवर केवळ २ मिनिटेच बोलले.’

राहुल गांधी यांनी म्हटले की, भाजप आणि त्याच्या नेतृत्वाखालील सरकारने मणिपुरात ‘भारतीय संकल्पने’चीच (आयडिया ऑफ इंडिया) हत्या केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘भारतमातेच्या हत्येवर बोलताना तुम्ही केवळ २ मिनिटे खर्च केलीत. तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही ‘भारतीय संकल्पना’ फेटाळूच कशी शकता? (वृत्तसंस्था)

४ महिने तुम्ही काय करत होतात?

राहुल गांधी यांनी म्हटले की, मागील ४ महिने तुम्ही काय करत होतात? तुम्ही तेथे (मणिपुरात) का नाही गेलात? तुम्ही हिंसाचार थांबविण्याचा प्रयत्न का नाही केला? कारण तुम्ही राष्ट्रवादी नाहीच आहात. ‘भारतीय संकल्पने’ची हत्या करणारा राष्ट्रवादी होऊच शकत नाही.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसwayanad-pcवायनाड