काँग्रेसने देशभरात 'मतचोरी'च्या मुद्द्यावरून मोठे अभियान सुरू केले आहे. यासंदर्भात काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी शुक्रवारी माहिती दिली. "भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 'मतचोरी' विरोधात देशव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून याअंतर्गत आतापर्यंत ५.५० कोटी लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राहुल गांधी यांनी पुराव्यासह या निवडणुकीत मतचोरी कशी होत आहे, हे दाखवून दिले आहे. राहुल गांधींनी देशाच्या गृहमंत्र्यांना पत्रकार परिषदेत या विषयावर चर्चा करण्याचे आव्हान दिले होते, मात्र, गृहमंत्री अमित शाह यांनी त्याला अद्यापही उत्तर दिलेले नाही," असे केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
वेणुगोपाल पुढे म्हणाले, "या मुद्दा अधिक प्रकाशझोतात आणण्यासाठी काँग्रेसच्या वतीने १४ डिसेंबर रोजी मोठी रॅली आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, यासंदर्भातील राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी वैयक्तिक भेटीसाठी वेळही मागितली आहे.
दरम्यान, माध्यमांनी पक्ष सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा खासदारांच्या बैठकी वेळी, 'वंदे मातरम्' आणि 'निवडणूक सुधारणा' या विषयांवरील चर्चेदरम्यान संसदेत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला नामोहरम केल्याचा दावाही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. एवढेच नाही तर, यावेळी गृहमंत्री अमित शाह मानसिकरित्या त्रस्त आणि दबावाखाली होते, कारण ते आणि त्यांचे संपूर्ण तंत्र मतचोरीमध्ये सहभागी होते, अशी टीकाही राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली.
दरम्यान, राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदारांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि सरकार आता या दोन्ही विषयांवर दबावाखाली असल्याचेही म्हटले आहे.
Web Summary : Congress launched a nationwide campaign against 'vote theft,' claiming 5.5 crore signatures. A rally is planned on December 14th. Rahul Gandhi accused Amit Shah of involvement in electoral malpractices, asserting government pressure on election reforms.
Web Summary : कांग्रेस ने 'मत चोरी' के खिलाफ देशव्यापी अभियान शुरू किया, 5.5 करोड़ हस्ताक्षर प्राप्त किए। 14 दिसंबर को रैली आयोजित होगी। राहुल गांधी ने अमित शाह पर चुनावी कदाचार में शामिल होने का आरोप लगाया और कहा सरकार चुनाव सुधारों पर दबाव में है।