शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलविले; भाजपाकडून फोडाफोडी करण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 13:00 IST

राजस्थान, हरयाणात भाजप फोडाफोडी करण्याची शक्यतेने काँग्रेसकडून जोरात तयारी

-आदेश रावलनवी दिल्ली : भाजपकडून  काँग्रेस आमदार फोडले जाण्याच्या धास्तीने  हरयाणा आणि राजस्थानच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून सुरक्षित ठिकाणाची शोधाशोध केली जात आहे. हरयाणाच्या आमदारांना राजस्थान किंवा छत्तीसगडला हलविण्याचा विचार आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या आमदारांची उदयपूरमधील काही हॉटेलांत ठेवण्यात आले आहे. 

हरयाणातून कार्तिकेय शर्मा आणि राजस्थानमधून सुभाष चंद्रा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून  उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या दोन्ही राज्यांत निवडणूक होत आहे. १० जूनला मतदान होणार आहे. तोपर्यंत या आमदारांना भाजपपासून सुरक्षित ठेवले जाईल.हरयाणात काँग्रेसचे ३१ आमदार आहेत; त्यापैकी कुलदीप बिष्णोई हे नाराज आहेत.

चंडीगडमध्ये अजय माकन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदारांना कुठे ठेवयाचे, यावर चर्चा झाली. चर्चेअंती सर्व आमदारांना राजस्थानला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण सुभाष चंंद्रा यांनी उमेदवारी दाखल केल्याने तेथेही निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री गेहलोत हे राज्यसभा निवडणुकीत व्यस्त असतील; तेव्हा हरयाणाच्या आमदारांंना छत्तीसगडला नेले जाऊ शकते.  छत्तीसगड सरकारने  मात्र एवढ्या आमदारांसाठी चांगले रिसॉर्ट उपलब्ध करून देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. 

टॅग्स :congressकाँग्रेस