शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींच्या निवडणूक क्षेत्रातील काँग्रेस आमदार म्हणाले,"योगींसारखे प्रामाणिक CM कदाचितच सापडतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 17:48 IST

योगी आदित्यनाथांसारखा प्रामाणिक मुख्यमंत्री पाहिला नसल्याचं काँग्रेस आमदाराचं वक्तव्य

ठळक मुद्देराकेश सिंह यांची सोमनाथ भारती यांच्यावरही टीकासोमनाथ भारती यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा चालवला पाहिजे, सिंह यांचं वक्तव्य

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचं निवडणूक क्षेत्र असलेल्या रायबरेलीतील काँग्रेसचे आमदार राकेश सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. राकेश सिंह हे हरचंदपुरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा प्रामाणिक मुख्यमंत्री आपण पाहिला नसल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. तसंच त्यांनी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावही निशाणा साधला. सोमनाथ भारती यांच्यावर रायबरेलीमध्ये शाई फेकण्यात आली होती. राकेश सिंह यांनी सोमनाथ भारती यांच्यावर हल्लाबोल करत योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. "उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसारखा प्रामाणिक आणि पूजनीय मुख्यमंत्री कदाचित कोणत्या ठिकाणी असेल. योगी आदित्यनाथ यांची अनेक ठिकाणी पूजा केली केली जाते. लोकं त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात," असं योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करताना राकेश सिंह म्हणाले.  यादरम्यान त्यांनी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावरही टीका केली. तसंच त्यांनी ज्या अयोग्य शब्दांचा वापर केला त्याविरोधात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसंच त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला गेला पाहिजे, असंही ते म्हणाले. सोमनाथ भारती यांना रायबरेलीतील एका गेस्ट हाऊसमध्ये हिदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी घेरल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर मोठं वादंग उठलं होतं. यादरम्यान एका तरूणानं सोमनाथ भारती यांच्यावर शाई फेकली. यानंतर आमदार आणि पोलिसांनी एकमेकांना धमकी दिल्याचाही प्रकार घडला. याव्यतिरिक्त भारती यांनी एका पोलिसाला कामावरून कमी करण्याचीही धमकी दिली होती. राकेश सिंह यांचे मोठे बंधू प्रताप सिंह हे सध्या भाजपामध्ये आहेत. तर राकेश सिंह हे अद्यापही काँग्रेसमध्येच आहेत. त्यांनी अनेकदा काँग्रेसचा विरोधही केला होता. रायबरेलीमध्ये काँग्रेसचा जोर सध्या कमी होताना दिसत आहे. नुकताच काँग्रसच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. दरम्य़ान, राकेश सिंह यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपाAAPआपPoliticsराजकारण