पुणे : लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा तयार करण्यात येत असून त्यात जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा जनतेच्या सूचनांबाबत आग्रह असून त्यासाठी प्रत्येक राज्यातील समितीने संकेतस्थळ जाहीर करून त्यावर सूचना मागवाव्यात, असे कळवण्यात आले आहे.पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बुधवारी बैठक झाली. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या तीन सदस्यांबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, आमदार अनंत गाडगीळ व समितीचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यात लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. राहुल यांच्या आग्रहानुसार mahaincmanifesto2019@gmail.com हे संकेतस्थळ जाहीर करण्यात आले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय असावे, यासंबंधी नागरिकांनी या संकेतस्थळावर आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले.
काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सूचनांवरून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:37 IST