शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

“PM बाकी सर्व विषयांवर बोलतात, पण मणिपूरवर नाही, मोदींच्या कृपेने...”; खरगेंची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 18:35 IST

Congress Mallikarjun Kharge Parliament Budget Session 2024: राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

Congress Mallikarjun Kharge Parliament Budget Session 2024: देशभरात दर २ तासांनी एससी-एसटी समाजातील ५ लोक विविध गुन्ह्यांचे बळी ठरतात. पंतप्रधान मोदी प्रत्येक विषयावर बोलतात, पण मणिपूरच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत. सरकार नेहमीच ओबीसी  आणि महिला आरक्षणाबाबत बोलत असते. मात्र, नुकतीच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे असून, केंद्राने त्याविरोधात प्रतिज्ञापत्र का दिले, अशी विचारणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांनी राज्यसभेत बोलताना केली.

राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. नेहरू स्मारकाचे नाव बदलण्याची काय गरज होती, अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी नेहरूजींचा फोटो कुठे आहे, असे विचारले होते. त्यांनी नेहरूजींचा फोटो परत लावला. पण ही आजची भाजपा फोडाफोडीचे राजकारण करणारी आहे. केंद्र सरकार संसदेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. संसदेवरील हल्ल्यात पकडलेल्या आरोपींना विजेचे शॉक दिले जात आहेत. एका विशिष्ट पक्षाचे नाव घेण्यास भाग पाडले जात आहे, असे गंभीर आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.

तुमच्याकडे बहुमत आहे, आता काय यापुढे ४०० पारही कराल!!!

पुढे बोलताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, तुमच्या बहुमत आहे, आधी ३३०-३३४ जागा होते, आता यापुढे ४०० चा आकडाही पार कराल, असे विधान करताच, सभागृहात हशा पिकला. पंतप्रधान मोदी यांनाही हसू आवरता आले नाही. पुढे खरगे म्हणाले की, त्यांना आधी निवडून येऊ द्या, हे सर्व पंतप्रधान मोदींच्या कृपेने आले आहेत. समोरच्या बाकांवर बसलेले सदस्य PM मोदींच्या आशीर्वादाने आले आहेत. त्यांचे काम आता फक्त बेंच वाजवणे एवढेच राहिले आहे, असा खोचक टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला.

दरम्यान, बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना हार का घालण्यात आले? पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हा मोहन भागवत त्यांच्यासोबत बसले होते. हे तेच मोहन भागवत आहेत, ज्यांनी एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेल्या आरक्षणावर चर्चेची मागणी केली होती. पण, पंतप्रधान या प्रकरणी कधीच काही बोलले नाहीत, या शब्दांत खरगे यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन