शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 06:52 IST

मध्य प्रदेशच्या गुप्तचर विभागाने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा अहवाल दिला आहे.

भोपाळ : सलग तीन वेळा सरकार स्थापन केलेल्या मध्य प्रदेशात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसाठी एक वाईट बातमी आहे. मध्य प्रदेशच्या गुप्तचर विभागाने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा अहवाल दिला आहे. हा अहवाल गुप्तचर विभागाने ३० आॅक्टोबरला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सोपवला आहे. इंडिया टुडे या नियतकालिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे.या अहवालात म्हटले आहे की, या निवडणुकीत राज्यातील एकूण २३० जागांपैकी काँग्रेस सर्वाधिक १२८ जागांवर आघाडी घेईल तर भाजपाच्या जागा घटून ९२ वर येतील. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या पदरात ६ जागा पडतील तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला ३ जागांवर समाधान मानावे लागेल. गोंडवाना गणतंत्र पार्टीला केवळ एक जागा मिळेल.विद्यमान सरकारमधील रुस्तम सिंग, माया सिंग, गौरीशंकर शेजवर आणि सुर्यप्रकाश मीना यांच्यासह १० मंत्र्यांना या निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागू शकते, असे अहवाल सांगतो. मीना हे मुख्यमंत्री चौहान यांच्या जवळचे मानले जातात. हा अहवाल समोर येताच दोन दिवसांनी, १ नोव्हेंबर रोजी मीना यांनी आपण निवडणुकीसाठी उभे रहात नसल्याचे जाहीर केले आहे. पराभवाच्या छायेतील अन्य दोन मंत्र्यांचे तिकीट कापले जाण्याची दाट शक्यता आहे परंतु ते उमेदवारीसाठी पक्षाच्या वरिष्ठांची मनधरणी करीत आहेत.ग्वाल्हेर-चंबल विभागात काँग्रेस उमेदवारांचा जोर असेल तर बुंदेलखंडातील काँग्रेस व भाजपाला समसमान यश मिळेल. विंध्य विभागात ३० पैकी १८ जागांवर काँग्रेसचा बोलबाला असेल तर ९ जागांवर भाजपाला मताधिक्य असेल. महाकोशलमध्ये ३८ पैकी २२ जागा काँग्रेसच्या खिशात जातील तर १३ जागांवर भाजपा विजय संपादन करेल.माळवा-निमार विभाग हा अलिकडेच उफाळलेल्या शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी होता. या भागात मतदारांचा थोडासा काँग्रेसकडे झुकताना दिसेल. या विभागात काँग्रेसला ३४ मिळतीळ तर भाजपाला ३२ जागांवर विजय मिळेल.(वृत्तसंस्था)भाजपाने आपल्या १७७ उमेदवारांची पहिलीच यादी जाहीर केली असतानाच हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018