नवी दिल्ली : राजस्थान व मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक मतदानासाठी अवघे पाचच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे देशभरातील सट्टेबाज सक्रिय झाले असून, त्यांना आता राजस्थान व मध्यप्रदेशात काँग्रेसच सत्तेवर येईल, असे वाटत आहे.याआधी केवळ राजस्थानातच काँग्रेसचे सरकार येईल, असा सट्टेबाजांचा अंदाज होता. पण आता मध्य प्रदेशातही सत्ताबदल होईल, असा सट्टे बाजारातील कल दिसत आहे. छत्तीसगडमध्ये मात्र भाजपाला बहुमत मिळेल, यावर सट्टेबाजांचे एकमत दिसत आहे. तेलंगणातही पुन्हा के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्रीय समितीचेच सरकार येईल, असे सट्टेबाजांना वाटत आहे. त्यामुळे टीआरएससाठीच अधिक सट्टा लावला जात आहे.
मध्यप्रदेश आणि राजस्थानात काँग्रेस, तर उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 05:29 IST