शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन घुसले काँग्रेस आमदार, अभूतपूर्व गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2018 5:54 PM

केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन दाखल झालेल्या काँग्रेस आमदारांमुळे आज अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. थिरुवंचूरमधले काँग्रेस पक्षाचे आमदार राधाकृष्णन वापरून झालेलं ग्रेनेड घेऊन विधान भवनात शिरले.

तिरुवनंतपुरम- केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन दाखल झालेल्या काँग्रेस आमदारांमुळे आज अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. थिरुवंचूरमधले काँग्रेस पक्षाचे आमदार राधाकृष्णन वापरून झालेलं ग्रेनेड घेऊन विधान भवनात शिरले. त्यांनी ग्रेनेड हातात घेऊन विधानसभा अध्यक्षांना दाखवले आणि सांगितले की, हे ग्रेनेड दाखवूनच गेल्या आठवड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना घाबरवण्यात आलं होतं. तर गेल्या काही तासांपूर्वीच कर्नाटकचे लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी यांना त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. गंभीर अवस्थेत शेट्टींना रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. हल्लेखोर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरुतल्या लोकायुक्त कार्यालयात बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी त्यांच्या ऑफिसमध्ये एका प्रकरणावर सुनावणी करत असताना ही घटना घडली होती.आरोपींनी धारदार शस्त्राने लोकायुक्तांवर हल्ला केला. तेजस शर्मा असं आरोपी हल्लेखोराचं नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली. तो टुमकुरचा रहिवासी असल्याची माहिती आहे. त्याप्रमाणेच केरळ विधानसभेत बुधवारी सभागृहात काँग्रेस आमदार ग्रेनेड घेऊन दाखल झाले. त्यामुळे अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. थिरुवंचूर काँग्रेस पक्षाचे आमदार राधाकृष्णन यांनी निकामी ग्रेनेड घेऊन विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. 

टॅग्स :KeralaकेरळKerala Congress (B)केरळ काँग्रेस (बी)