शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील घडामोडींवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज सोनिया गांधींशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 06:34 IST

शिवसेना आणि भाजप यांच्यात सरकार स्थापन करण्यावरून जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती समोर ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निर्णय घेतील.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर असून उच्चपदस्थ सूत्रांनुसार महाराष्ट्रातील चार मोठे नेते पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना शुक्रवारी भेटण्यासाठी गुरुवारी रात्री दिल्लीला जात आहेत. त्यात प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण तसेच विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे.

या नेत्यांची महाराष्ट्राचे प्रभारी महासचिव मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत सोनिया गांधी यांच्याशी भेट होईल. तीत विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड व राज्यातील ताज्या राजकीय घडमोडींवर चर्चा होण्याचे संकेत आहेत. सूत्रांनी दावा केला की, नियोजित बैठकीत हे ठरण्याची शक्यता आहे की विधानसभेत पक्षाचा नेता कोण असेल. शिवसेना व भाजप यांच्यात सरकार स्थापण्यावरून सुरू असलेल्या वादावरही बैठकीत चर्चा होईल. परंतु, निर्णय सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतरच घेतला जाईल.

पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शिवसेना आणि भाजप यांच्यात सरकार स्थापन करण्यावरून जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती समोर ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निर्णय घेतील. शरद पवार यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जाऊ शकतात व काँग्रेस त्यानुसार चालेल, असे हा नेता म्हणाला. कारण काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या इच्छेविरुद्ध या गुंतागुंतीच्या मुद्यावर कोणताही निर्णय घेऊ इच्छित नाही.

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार