शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते देणार राहुल गांधींना साथ, १३ जूनला ईडीसमोर हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 09:27 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल यांना ५ जून रोजी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीसमोर हजर व्हायचे होते.

- आदेश रावल

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी १३ जून रोजी ईडीसमोर हजर होणार आहेत. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना, सरचिटणीस, प्रभारी आणि लोकसभा, राज्यसभा संसद सदस्य यांना दिल्लीतच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे सर्व नेते ईडीच्या कार्यालयाकडे जाणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल यांना ५ जून रोजी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीसमोर हजर व्हायचे होते. राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांनी ईडीला पत्र लिहून सांगितले होते की, राहुल गांधी हे विदेशात आहेत. त्यामुळे त्यांना काही दिवसांची सवलत दिली जावी. त्यानंतर ईडीने १३ जून रोजी हजर होण्यास सांगितले होते. याच दरम्यान सोनिया गांधी यांना कोरोना झाला. त्यामुळे त्या ८ जून रोजी ईडीसमोर हजर झाल्या नाहीत.

यापूर्वी ईडीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्धही प्रकरण दाखल केले होते. त्यावेळी शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून आपली बाजू मांडणार असल्याचे जाहीर केले होते. अर्थात ईडीने शरद पवार यांना कोणतीही नोटीस जारी केली नव्हती. हे प्रकरण सप्टेंबर २०१९ मधील ५ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचे आहे. शरद पवार यांच्या घोषणेमुळे ईडीवर दबाव आला आणि एजन्सीने मेल पाठवून शरद पवार यांना सध्या चौकशीची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांनी ईडीच्या कार्यालयात  न येण्यास सांगितले.

- प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अशीच घटना कोलकात्यात घडली होती. तृणमूलच्या दोन मंत्र्यांना सीबीआयने अटक केली होती. १८ मार्च २०२१ रोजी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन मंत्र्यांच्या अटकेनंतर सीबीआयच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले होते. - अर्थात, न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना फटकारले होते. पण, सीबीआय त्यांच्या आक्रमकतेच्या दबावात आली आणि आतापर्यंत त्या मंत्र्यांच्या प्रकरणात कोणतीही प्रगती झालेली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस