शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

सोनिया, राहुल, प्रियांका गांधी आपल्या पदांचे राजीनामे देणार?; आज कार्यकारिणीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 06:29 IST

काँग्रेसचा इन्कार

-शीलेश शर्मा नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झाल्यानंतर रविवारी होत असलेल्या पक्षकार्यकारिणीच्या बैठकीत विद्यमान नेतृत्वावर घणाघाती टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीच्या प्रारंभीच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल  आणि प्रियांका  आपापल्या पदांचे राजीनामे देणार असल्याचे कळते.  मात्र, काँग्रेसने या वृत्ताचा इन्कार केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  काँग्रेसमध्ये तातडीने संघटनात्मक निवडणुका घेण्याचा आग्रह सोनिया गांधी कार्यकारिणीच्या बैठकीत धरणार आहेत. या निवडणुकांमुळे काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष व नवी कार्यकारिणी अशा दोन्ही गोष्टी मिळतील. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कोणते मुद्दे उपस्थित करायचे याची रणनीती  पक्षातील २३ नाराज नेत्यांनी ठरविली आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते  गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी नाराज नेत्यांची एक बैठकही झाली. रविवारी राहुल यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.  

सूत्रांच्या सांगण्यानुसार, अशोक गेहलोत किंवा सचिन पायलट यापैकी एका नेत्याची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करावी, असा मतप्रवाह आहे. गेहलोत अध्यक्ष झाल्यास पायलट यांच्यावर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी केली जाणार आहे. पंजाब प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुनील जाखड यांच्याकडे देण्याची अनुकूलता पक्षात असल्याचे समजते. उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही काँग्रेसच्या नेतृत्वात बदल केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी दिल्लीत दाखल झाले. थोरात काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत, तर चव्हाण यांनी बंडखोर नेत्यांशी चर्चा केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा परिणाम महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर होणार नसल्याचे थोरात यांनी पत्रकारांना सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस