शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

देश जन्मल्यानंतर जन्माला आलेले मोदी राष्ट्रपिता कसे?; शशी थरुर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 9:25 AM

'राष्ट्रपिता'वरुन थरुर यांचा मोदींना टोला

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता. त्यावरुन बराच वादंग माजला. यावरुन आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी मोदींवर निशाणा साधला. देश जन्माला आल्यानंतर जन्मलेले मोदी राष्ट्रपिता कसे होऊ शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्यांनी मोदींचा उल्लेख 'फादर ऑफ इंडिया' असा केला. त्यावर शशी थरुर यांनी भाष्य केलं. 'भारताचा जन्म १९४७ मध्ये झाला आणि मोदींचं जन्मवर्ष १९४९ किंवा १९५० आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना बहुधा याची कल्पना नसावी. मुलाच्या जन्मानंतर वडिलांचा जन्म होणं अवघड आहे,' अशा शब्दांमध्ये थरुर यांनी जोरदार टोला लगावला आहे.  काश्मीर प्रश्नावरुन मोदी सरकारनं घेतलेल्या भूमिकेचं थरुर यांनी स्वागत केलं. 'काश्मीर प्रश्नावर आपल्याला मध्यस्थाची गरज नाही. पाकिस्तानसोबत संवाद साधण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही. मात्र ते एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात बॉम्ब घेत असतील, तर मग बातचीत होणं अवघड आहे. पाकिस्ताननं दहशतवादी तळ बंद केल्यास संवाद शक्य आहे,' असं थरुर म्हणाले.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मोदी सरकारनं यावर ठाम भूमिका घेत हा भारत, पाकिस्तान यांच्यातील वाद असून त्यात तिसऱ्या देशानं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं. त्यावर भाष्य करताना काँग्रेस आणि भाजपाची भूमिका सारखीच असल्याचं थरुर म्हणाले. काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही. पाकिस्तानसोबत संवाद साधला जाऊ शकतो. मात्र ते दहशतवाद्यांना थारा देत असल्यानं आम्ही त्यांच्याशी असलेला संवाद बंद केला आहे, असं थरुर म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShashi Tharoorशशी थरूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तान