शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते ही म्हणतात, लोकसभा निवडणुकीत मोदींची त्सुनामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 17:31 IST

पहिल्यांदाच काँग्रेसच्या  नेत्याने मोदींची लोकप्रियता असल्याचे मान्य केले आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत अवघ्या ५२ जागांवर समाधान मानावे लागणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी देशात मोदींची लाट असल्याचे मान्य केले आहे. मोदींच्या लोकप्रियतेच्या लाटेत सगळेच वाहून गेले, असं विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं आहे. फर्रुखाबाद येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.

देशात मोदींची त्सुनामी आहे, असे भाजपच्या नेत्यांनी अनेकदा सांगितले. पण पहिल्यांदाच काँग्रेसच्या  नेत्याने मोदींची लोकप्रियता असल्याचे मान्य केले आहे.  सलमान खुर्शीद यांनी देशात मोदी लाट असल्याचं मान्य केलं आहे. देशात मोदींची त्सुनामी आली असून त्यात सगळे वाहून गेले आहेत. आम्ही जिवंत आहोत आणि बोलू शकत आहोत हेच नशीब मानायचे असं खुर्शीद म्हणाले.

मोदींच्या लाटेत आजही काँग्रेस पक्ष जिवंत राहण्यास यशस्वी राहिला आहे. मोदींची लोकप्रियतेला आम्ही नाकरणे म्हणजेच, निवडणुका मान्य नसल्याचा त्याचा अर्थ होतो. २०१४ च्या निकाल पहिला तर यावेळी आम्हाला आठ जागांचा फायदा झाला असल्याचे, खुर्शीद म्हणाले.

खुर्शीद यांनी फारुकाबाद मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ ला लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र दोन्हीवेळा त्यांचा दारूण पराभव झाला. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खर्शीद यांनी मोदींबद्दल विधान करताना देशात मोदींची त्सुनामी आली असल्याचे विधान केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खुर्शीद यांना जेमतेम ५५,००० मतं मिळाली होती.