देशात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ग्रामीण भागात पसरत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावावरून बोचरी टीका केली आहे. यापूर्वीही राहुल गांधींनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’, असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून एका वृत्ताची हेडलाईन शेअर करत यावर टीका केली आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोनाच्या परिस्थितीतवरु टीका केली होती.
Coronavirus : शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’; राहुल गांधींची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 18:14 IST
शहरांनंतर ग्रामीण भागातही पसरत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव
Coronavirus : शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’; राहुल गांधींची बोचरी टीका
ठळक मुद्देशहरांनंतर ग्रामीण भागातही पसरत आहे कोरोनाचा प्रादुर्भावराहुल गांधींनी ट्वीट करत साधा निशाणा.