शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

“८ वर्षांपूर्वी प्रत्येक वर्षी २ कोटी नोकऱ्यांचं सांगितलं, तसंच आता १० लाख सरकारी नोकऱ्यांची वेळ”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 20:08 IST

Rahul Gandhi over PM Modi : राहुल गांधींचा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा

Rahul Gandhi over PM Modi : रोजगार निर्मितीच्या माध्यमातून वाढती बेरोजगारी आणि आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थेला सरकार मोठा बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत माहिती दिली की सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून सरकारने पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये १० लाख लोकांची भरती करावी असे निर्देश दिले. दरम्यान, या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

“जसं आठ वर्षांपूर्वी तरूणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं, तसंच आता १० लाख सरकारी नोकऱ्यांची वेळ आहे. हे जुमल्यांचं नाही, ‘महा जुमल्यांचं’ सरकार आहे. पंतप्रधान नोकऱ्या निर्माण करण्यात नाही, तर बातम्या तयार करण्यात एक्सपर्ट आहेत,” असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.ट्वीटद्वारे माहिती केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लक्षावधी बेरोजगार युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारतर्फे पुढील दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देण्यात येतील. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी एप्रिल महिन्यातही संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी, नोकरी देण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच, सरकारमधील रिक्त जागांवर लवकरात लवकर पदांची भरती करावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यातून, देशातील युवकांना नोकरीची चांगली संधी मिळेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाjobनोकरी