शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

'बाबा, भारतासाठी तुमची जी स्वप्ने होती...'; राहुल गांधींनी लडाखमध्ये राजीव गांधी यांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 10:24 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखमधील १४२७० फूट उंचीवर असलेल्या पैंगात्सो तलावाच्या काठावर भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली

आज देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखमधील १४२७० फूट उंचीवर असलेल्या पंगत्सो तलावाच्या काठावर राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. कालच राहुल गांधी हे बाईकवरुन लडाख येथे पोहोचले आहेत. 

स्मृती इराणी टॉमेटो दरवाढीच्या प्रश्नावर भडकल्या; अँकरला तुरुंगाची आठवण केली

जम्मू-काश्मीर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास रसूल वली म्हणाले की, राजीव गांधींनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ आम्ही येथे जमलो आहोत. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या वडिलांचे स्मरण करताना राहुल गांधींनी लिहिले, पापा, भारतासाठी तुमच्या डोळ्यातील स्वप्ने या अनमोल आठवणींनी भरून गेली आहेत. तुमच्या जखमा हा माझा मार्ग आहे - प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्ने समजून घेणे, भारत मातेचा आवाज ऐकणे.

श्रद्धांजलीनंतर राहुल गांधी यांनी चिनी घुसखोरीवर बोलताना म्हणाले की, इथे सगळे म्हणत आहेत की चिनी सैन्य घुसले आहे. पंतप्रधान म्हणतात की इथे कोणी आलेले नाही जे खरे नाही. इथे कोणाला विचाराल, तेच म्हणतील. भारत जोडो यात्रेदरम्यान आम्हाला येथे यायचे होते, पण काही कारणांमुळे आम्ही येथे येऊ शकलो नाही.

"लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. लडाखला मिळालेल्या दर्जावर लोक खूश नाहीत. लोकांना प्रतिनिधित्व हवे आहे. राज्य नोकरशाहीने चालवू नये, ते जनतेच्या आवाजाने चालवले पाहिजे, असे लोक म्हणत आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याची केंद्रशासित प्रदेशात पुनर्रचना झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिला लडाख दौरा आहे. पुढच्या आठवड्यात ते कारगिलला जाणार आहेत, तिथे पुढच्या महिन्यात हिल कौन्सिलच्या निवडणुका होणार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधी