शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राहुल गांधींनी घेतली मोदी-अदानींचा मुखवटा लावलेल्या खासदारांची मुलाखत, विचारले असे प्रश्न; भाजप भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:38 IST

"त्यांना (काँग्रेस) देशातील उद्योगपती नको आहेत, परदेशातील उद्योगपती हवे आहेत. त्यांना जॉर्ज सोरोस हवा आहे, जो भारतात अस्थिरता निर्माण करेल..."

अदानी लाच प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमधील वाक्युद्ध आता नव्या पातळीवर पोहोचताना दिसत आहे. यासंदर्भात संसदेत चर्चेला परवानगी न दिल्याने नाराज काँग्रेसने सोमवारी (9 डिसेंबर 2024) विरोधाचा एक नवा मार्ग शोधून काढला. याची सध्या जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे.

काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकार आणि अदाणी समूहातील संबंधांसंदर्भातील आपल्या आरोपांचा पुनरुच्चार करत एक वीडियो तयार केला. हा व्हिडिओ संसदभवन परिसरात तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेस खासदार शिवाजी काळगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार मणिकम टागोर यांनी अदानी यांचा मुखवटा घातला होता. तर समोर उभे असलेले राहुल गांधी या दोघांना प्रश्न विचारत होते.

राहुल गांधींनी विचारले असे प्रश्न -राहुल गांधी : आजकाल काय सुरू आहे भाऊ?अदानींचा मुखवटा लावलेले खासदार : आजकाल मी जे बोलतो, हे करतात.

राहुल गांधी : आपण पुढे काय घेण्याच्या प्रयत्नात आहात?अदानींचा मुखवटा लावलेले खासदार : काहीही वाटते, एअरपोर्ट हवे... काहीही हवे...यावेळी अदानी यांचा मुखवटा घातलेले खासदाराने मोदींचा मुखवटा घातलेल्या खासदाराच्या पाठीवर थाप मारत, आज सायंकाळी आमची बैठक आहे. हा भाऊ आहे आपला.

राहुल गांधी : हे फारच सेरिअस वाटत आहेत, कमी बोलतात आजकाल...?अदानींचा मुखवटा लावलेले खासदार : हे आजकाल थोडे टेन्शनमध्ये आहेत.

राहुल गांधी : आपली पार्टनरशिप केव्हापासून सुरू आहे?अदानींचा मुखवटा लावलेले खासदार : मोदींचा मुखवटा लावलेल्या खासदाराचा हात पकडत म्हणाले, वर्षानुवर्षे.

भाजपचा पलटवार -हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपनेही काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. यावर बोलताना भाजप खासदार दिनेश शर्मा म्हणाले, "आज ज्येष्ठ नेते मुखवटा लावून संसदेत उभे आहेत आणि पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरत आहेत... त्यांना देशाच्या लोकशाहीचा आदर कसा करा हेच कळत नाही... काँग्रेस आता हताश, निराश, थकली आणि अस्तित्वहीन नेत्यांचा समूह बनली आहे. त्यांच्याशी संबंधित विरोधी पक्षही हळूहळू वेगळे होत आहेत. त्यांना देशातील उद्योगपती नको आहेत, परदेशातील उद्योगपती हवे आहेत. त्यांना जॉर्ज सोरोस हवा आहे, जो भारतात अस्थिरता निर्माण करेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीGautam Adaniगौतम अदानीParliamentसंसद