शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

'देशाला PM आवास नव्हे, श्वास पाहिजे', राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 12:22 IST

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देयाआधीही देशातील कोरोना परिस्थितीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा पार केला आहे. हा कोरोना संसर्ग वाढीचा वेग इतका आहे की,  गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या एक कोटींवरून दोन कोटींवर गेली आहे. या कोरोना परिस्थितीवरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर टीका होत आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Congress leader Rahul Gandhi attacks PM Modi on corona virus)

राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशाला पीएम आवास नव्हे, श्वास पाहिजे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत इंडिया गेट आहे. त्या ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम केलेले दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत लोक तोंडाला मास्क लावून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ऑक्सिजनसाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत.

दरम्यान, याआधीही देशातील कोरोना परिस्थितीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचे म्हणत मोदींना सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे. 

याचबरोबर, कोरोना व्हायरसच्या सर्व स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा गंभीर आरोपही राहुल यांनी आपल्या पत्रातून केला आहे. अशावेळी गेल्या वर्षीसारखे गरिबांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने आर्थिक मदत पोहचवण्यात यावी असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

(पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा का हरले?, 'रोखठोक'मधून संजय राऊतांनी सांगितलं कारण)

लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच - राहुल गांधीगेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधीपंतप्रधान मोदी आणि केंद्रावर वारंवार टीका करत आहेत. केंद्र सरकारची धोरणे, कोरोना परिस्थिती, लॉकडाऊन, लसीकरण यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसशासित राज्यांनी कोरोना लसींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर आक्षेप नोंदवला होता. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 

( AMU मध्ये कोरोनाचा कहर! दोन आठवड्यात 15 प्राध्यापकांचा मृत्यू, विद्यापीठात भीतीचे वातावरण)

देशात आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांचा मृत्यूआतापर्यंत देशात 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेस