शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाबाधितांची संख्या कमी दाखवण्यासाठी केंद्रानं चाचण्या कमी केल्या; पी. चिदंबरम यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 09:34 IST

कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधकांचा केंद्रावर निशाणा. कोरोनाच्या चाचण्या कमी केल्यामुळे संख्या कमी येत असल्याचा चिदंबरम यांचा दावा

ठळक मुद्देकोरोनाच्या चाचण्या कमी केल्यामुळे संख्या कमी येत असल्याचा चिदंबरम यांचा दावातिसरी लाट अटळ असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

सध्या देशात मोठ्या प्रमाणात दररोज कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून विरोधक सातत्यानं केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रानं कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी चाचण्या कमी केल्या असल्याचा दावा माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना केली आहे. लोकांची फसवणूक करण्याऐवजी सरकारनं कोरोनाच्या चाचण्य़ा वाढवल्या पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. पी. चिदंबरम यांनी ट्विटरवर एक चार्ट शेअर केला आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी १८-१९ लाख चाचण्या होत असल्याच म्हटलं आहे. तसंच गेल्या दोन-तीन दिवसांपासून ती संख्या १५ लाखांवर आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. "ही बिलकुल हैराण करणारी बाब नाही. हा संसर्ग कमी होण्याचा पुरावाही नाही. कमी चाचण्या करा, कोरोना बाधितांची संख्या कमी येईल. जर तुम्ही चाचण्याच केल्या नाही तर कोरोनाचं कोणतंही प्रकरणच समोर येणार नाही. सरकारनं लोकांची फसवणूक करून नये. त्यांनी चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे," असं चिदंबरम म्हणाले. तिसरी लाट अटळदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येणं अटळ आहे. मात्र ती केव्हा येणार हे निश्चित सांगता येणार नाही असा दावा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार व ख्यातनाम शास्त्रज्ञ के. विजयराघवन यांनी केला आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या लाटा येणार असून त्याचा मुकाबला करण्यासाठी देशाने सज्ज झालं पाहिजे.हेही वाचा - कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी, स्पष्ट धोरण नाही; कपिल सिब्बल यांचा निशाणा"देशात लसीकरण मोहिमेत देण्यात येत असलेल्या लसी सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूंवर प्रभावी आहेत. मात्र कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रभावी लसी तयार करणेही आवश्यक आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे संसर्गात तसेच रुग्णसंख्येत  वाढ झाली आहे. त्याचा देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनाचे निकष पाळून कमी वेळेत  औषधे, लसी तयार करण्याच्या प्रयत्नांत आहेत," असंही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याP. Chidambaramपी. चिदंबरमIndiaभारत