शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

"काँग्रेसनं ७० वर्षांत काहीच केलं नाही, तर मग तुम्ही काय विकताय?"

By कुणाल गवाणकर | Updated: September 21, 2020 15:02 IST

काँग्रेस नेत्या नगमा यांचा मोदी सरकारला अप्रत्यक्ष टोला

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून देशात खासगीकरणाचा सपाटा सुरू आहे. विमानतळं, रेल्वे गाड्यांचं खासगीकरण करण्याचे निर्णय मोदी सरकारनं घेतले आहेत. देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्यानं सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा धडाका लावण्यात आला आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. सरकारी कंपन्यांना खासगी हातांमध्ये सोपवण्याची आवश्यकता काय, असे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले जात आहेत.काँग्रेस नेत्या नगमा यांनी खासगीकरणावरून सरकारला जोरदार टोला लगावला आहे. 'काँग्रेसनं ७० वर्षांत काही केलेलंच नाही. मग तुम्ही जे विकताय ते काय तुमच्या आजीनं हुंड्यात आणलं होतं का?,' असा सवाल त्यांनी विचारला आहे. नगमा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांचा निशाणा मोदी सरकारवर असल्याचं स्पष्ट आहे.  गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्था संकटात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे कित्येक दिवस देशाच्या अर्थव्यवस्था ठप्प झाली. सरकारला मिळणारा महसूल आटला. मात्र त्याचवेळी आरोग्य व्यवस्थेवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. आता देश अनलॉकमधून जात असला, तरी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आलेली नाही. कोरोना संकट येण्यापूर्वीही देशाची अर्थव्यवस्था मंदीसदृश्य स्थितीतूनच जात होती.शेतकरी मुद्द्यावर विरोधक फसणार? सरकार महिनाभर आधीच रब्बीच्या एमएसपीची घोषणा करणारसरकार मिळणारा महसूल कमी झाल्यानं खासगीकरणाचा सपाटा सुरू आहे. जवळपास १५० गाड्यांचं खासगीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी सरकारनं निविदा मागवल्या आहेत. यानंतर जीएमआर इन्फ्रा आणि अदानी एंटरप्रायजेस सारख्या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. रेल्वे गाड्यांचं खासगीकरण झाल्यानंतर तिकिटांचे दर ठरवण्याचा पूर्ण अधिकार त्यांना असेल. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढतील. देशात रेल्वे तिकिटांचे दर हा अतिशय संवेदनशील मुद्दा मानला जातो. त्यामुळे याचा फटका सरकारलाही बसू शकतो."लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच, आधी आवाज दाबला आणि आता...", राहुल गांधी संतापले

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसIndian Railwayभारतीय रेल्वे