शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींचं मोदींना भावनिक पत्र, 'त्या' मुलांच्या मदतीसाठी केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 14:52 IST

कोरोना महामारीत देशातील अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक युवक, शाळकरी मुलांना आपल्या आई-वडिलांना गमावलंय. तर, अनेकांनी आपले पालकच या संकाटात गमावले आहेत

ठळक मुद्देदेशातील या 661 नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, पण कोरोना महामारीच्या संकटात आपले आई-वडिल गमावलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केली आहे

नवी दिल्ली - देशात कोरोना संसर्गामुळे अनेक परिवार उध्वस्त झाली आहेत. कित्येकांनी आपले जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ठ आणि आई-वडिलांनाही गमावलं आहे. मुले लहान असतानाच आई-वडिलांचं छत्र हरवल्याने कित्येक कुटुंबातील चिमुकली अनाथ बनली आहेत. या अनाथांना आधार देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. मोदींना लिहिलेल्या पत्रात नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, पण कोरोनामुळे आई-वडिल गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची मागणी केली आहे. 

कोरोना महामारीत देशातील अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक युवक, शाळकरी मुलांना आपल्या आई-वडिलांना गमावलंय. तर, अनेकांनी आपले पालकच या संकाटात गमावले आहेत. त्यामुळे, अशा अनाथ मुलांना भविष्याील शिक्षणासाठी आधारच उरला नाही. त्यामुळे, या मुलांच्या मदतीसाठी सोनिया गांधींनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. आपणास ज्ञात आहेच, माझे पती स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात नवोदय विद्यालयांची स्थापना केली. देशाच्या ग्रामीण भागातील युवकांना उच्च दर्जाचं, सोयीचं, आधुनिक आणि परवडणार शिक्षण मिळावं, हेच त्यांचं स्वप्न होतं. सध्या देशात 661 नवोदय विद्यालय आहेत.  देशातील या 661 नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, पण कोरोना महामारीच्या संकटात आपले आई-वडिल गमावलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केली आहे. या पीडित मुलांसोबत घडलेल्या अकल्पनीय दु:खामुळे आपण राष्ट्र म्हणून त्यांच्या पाठिशी उभा राहायला हवं, त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा, असे भावनिक पत्र सोनिया गांधींनी मोदींना लिहिले आहे. 

मध्य प्रदेशात दरमहा 5 हजार पेन्शन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना दरमहा 5000 रुपये पेन्शन देण्यात येईल. या मुलांना मोफत शिक्षण आणि त्यांच्या कुटूंबियांना मोफत रेशनचीही व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनामुळे अनेक कुटूंबे मोडली आहेत, तर काहीनी आपल्या म्हातारपणाची काठी गमावली आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या कुटुंबांना सरकारकडून दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी