शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात 'मलाईदार' खात्यांवरून रस्सीखेच, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर काँग्रेस ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 14:58 IST

कर्नाटकातल्या जेडीएस आणि काँग्रेसमधल्या खातेवाटपावरून सुंदोपसुंदी अद्यापही सुरूच आहे.

नवी दिल्ली- कर्नाटकातल्या जेडीएस आणि काँग्रेसमधल्या खातेवाटपावरून सुंदोपसुंदी अद्यापही सुरूच आहे. विशेष म्हणजे काँग्रेस दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर अद्यापही ठाम आहे. तसेच ते दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाकडूनच व्हावेत, अशीही काँग्रेसची इच्छा आहे. परंतु कुमारस्वामी त्यासाठी तयार नाहीत. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासोबत जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्याच वेळी काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खातेवाटपावरून चढाओढ सुरू झाली.खातेवाटपाबाबत काँग्रेससोबत मतभेद असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी जाहीरपणे सांगितले.  मात्र, याचवेळी सरकारला कोणताही धोका नसल्याचंही त्यानं स्पष्ट केले. एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले की, 'काही खात्यांबाबतीत काँग्रेससोबत आमचे मतभेद आहेत. मात्र याचा सरकारला कोणताही धोका नाही. हा मुद्दा आम्ही प्रतिष्ठेचा बनवणार नाही. संबंधित विषय फार न ताणता त्यावर तोडगा काढला जाईल.राज्यातील काँग्रेस नेत्यांना पक्षाच्या अध्यक्षांची मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यासहीत काँग्रेसचे अन्य नेतेमंडळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. कर्नाटकात दोन दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जनता दल सरकारने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले होते.कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर विरोधी पक्षनेते येडियुरप्पा यांनी भाषण केले खरे, पण ठराव मतदानास टाकण्याआधी भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला होता. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात एकही मत पडले नव्हते.विधानसभाध्यक्षपदीही काँग्रेसचे के. आर. रमेशकुमार यांची एकमताने निवड झाली. त्यांच्या विरोधातील भाजपाचे उमेदवार एस. सुरेशकुमार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने रमेशकुमार बिनविरोध निवडून आले. विधानसभा अध्यक्षासाठीची निवड व विश्वासदर्शक ठराव या दोन्हींत भाजपा सहभागी झाला नाही.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८