शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा ‘हात’च देशाला मार्ग दाखवेल; दिल्लीत पक्षाच्या अधिवेशनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 06:08 IST

समाजाची जात, धर्म, पंथ, प्रांत अशी विभागणी केली जात आहे, भांडणे लावली जात आहेत, असा आरोप मोदी सरकारवर करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचा ‘हात’च देशाला व लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करेल, असा दावा पक्षाच्या अधिवेशनात केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : समाजाची जात, धर्म, पंथ, प्रांत अशी विभागणी केली जात आहे, भांडणे लावली जात आहेत, असा आरोप मोदी सरकारवर करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचा ‘हात’च देशाला व लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करेल, असा दावा पक्षाच्या अधिवेशनात केला. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारताची भाषा करतात. पण आम्ही सूड व अहंकारमुक्त भारत बनवू इच्छितो, अशा शब्दांत सरकारवर हल्ला चढवला.पक्षाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात राहुल गांधी यांनी मोदी यांच्या वारेमाप आश्वासनांची खिल्ली उडवली. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव कुठे मिळाला? युवकांच्या रोजगाराचे काय झाले? हे ज्वलंत प्रश्न असल्याचे सांगून ते म्हणाले की, केवळ काँग्रेसच प्रश्न सोडवण्याचा मार्ग दाखवू शकतो. ते द्वेषाचे राजकारण करतात, तर आम्ही प्रेमाचे. हा देश प्रत्येक जात, धर्माचा असून सर्वांना एकत्र घेऊन काँग्रेस पुढे चालत राहील. राहुल गांधी समारोपाचे भाषण सविस्तर करणार आहेत.सोनिया गांधी यांनी भाषणाची सुरुवातच मोदी यांच्यावरील हल्ल्याने केली. ते काँग्रेसला नष्ट करू इच्छितात. पण लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल काय भावना आहे, याचा पुरावा गुजरात तसेच राजस्थान व मध्य प्रदेशसह अन्य पोटनिवडणुकांच्या निकालांनी दिला आहे, असे गांधी म्हणाल्या.सोनिया गांधी पक्षाध्यक्ष नसल्या तरी त्यांचे भाषण सुरू होताच ‘सोनिया गांधी झिंदाबाद’च्या जोरदार घोषणा सुरू झाल्या. राहुल गांधी यांच्यासाठीही इतक्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत.नेते व्यासपीठावर नाहीतया महाअधिवेशनात बराचबदल दिसत होता. आतापर्यंत कार्यकारिणीचे सदस्य, पक्षाच्या अध्यक्षांसह अन्य नेते व्यासपीठावर असत. परंतु, ही परंपरा बाजूला सारून व्यासपीठावर फक्त संबंधित वक्ता असेल, अशी व्यवस्था केली होती.तरुणांना पुढे आणणारपक्षामध्ये आता तरुणांना पुढे आणले जाईल. मात्र वरिष्ठ नेत्यांशिवाय पक्ष चालवणे शक्य नसून, वरिष्ठ व तरुण नेते यांना जोडण्याचे काम करण्याची माझी जबाबदारी आहे, असे राहुल म्हणाले. राजकीय व कृषी प्रस्तावावर बोलणारे ८० टक्के वक्ते तरुण होते. यापुढे काँग्रेसची सूत्रे तरुणांच्या हाती असतील, असा संदेश देण्यात आला.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी