शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 06:15 IST

राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून, ते खरे ठरल्यास काँग्रेसला अच्छे दिन येतील.

नवी दिल्ली : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून, ते खरे ठरल्यास काँग्रेसला अच्छे दिन येतील. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल. मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल वा सत्तेपाशी पोहोचेल. तेलंगणात टीआरएसच सत्तेत येईल आणि मिझोरममधील काँग्रेसची सत्ता जाऊ शकेल.राजस्थान व तेलंगणात शुक्रवारी अुनक्रमे ७२.६८ व ६८ टक्के मतदान झाले. ते संपताच एक्झिट पोलचे निष्कर्ष येऊ लागले. मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजपात चुरशीची लढत दिसत असून, तीन चाचण्यांनी काँग्रेसला बहुमत मिळेल वा तो पक्ष सत्तेपर्यंत पोहोचेल, असे म्हटले आहे. राजस्थानमध्ये १0 संस्था व वृत्तवाहिन्यांनी मिळून एक्झिट पोल घेतले. त्यात भाजपाच्या पराभवाचे निष्कर्ष निघाले आहेत.छत्तीसगडही भाजपाकडे राहणे अवघड दिसत आहे. तिथे काँग्रेसचे सरकार येईल, असे तीन पोलचे निष्कर्ष आहेत. तिथे १५ वर्षे भाजपा सत्तेत आहे. तेलंगणात टीआरएसच पुन्हा सत्तेवर येईल, असे निष्कर्ष असून, मिझोरम कदाचित काँग्रेसच्या हातातून मिझो नॅशनल फ्रंटकडे जाऊ शकेल.>काही चाचण्यांचे निष्कर्षमध्य प्रदेश 230 जागा 75% मतदानसर्वे भाजपा काँग्रेस इतरअ‍ॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडे 102-122 104-122 4-11टाइम्स नाऊ-सीएनएक्स 126 89 15एबीपी-लोकनीती 94 126 10इंडिया न्यूज-नेता 106 112 12रिपब्लिक 108-128 95-115 7न्यूज नेशन 108-112 105-109 11-15इंडिया टीव्ही 122-130 86-92 6-92013 मध्ये । भाजपा 165 । काँग्रेस 58>राजस्थान 199 जागा 73% मतदानसर्वे भाजपा काँग्रेस इतरइंडिया-टुडे अ‍ॅक्सिस 55-72 119-141 04-11टाइम्स नाउ-सीएनएक्स 85 105 09रिपब्लिक-सी वोटर 83-103 81-101 152013 मध्ये । भाजपा 163 । काँग्रेस 21>छत्तीसगड 90 जागा 75%सर्वे भाजपा काँग्रेस इतरइंडिया न्यूज-नेता 43 40 07टाइम्स नाउ-सीएनएक्स 46 35 07इंडिया टुडे 21-31 55-65 04-08न्यूज नेशन 38-42 40-44 04-08>मिझोरम 40 जागा 80%सर्वे काँग्रेस एमएनएफ इतररिपब्लिक-सी वोटर 14-18 16-20 3-10टाइम्स नाउ-सीएनएक्स 16 18 062013 मध्ये । काँग्रेस 34>तेलंगणा 119 जागा 67%सर्वे टीआरएस काँग्रेस+ भाजपा इतरसी वोटर 54 53 5 7इंडिया टुडे 85 27 2 5जन की बात 57 45 5 12न्यूजएक्स 57 46 6 10टाइम्स नाऊ 66 37 7 92014 मध्ये । टीआरएस 63 । काँग्रेस 21 । इतर 27>पोल ऑफ पोलमध्य प्रदेश भाजपा 109 काँग्रेस 111 इतर 10राजस्थान भाजपा 78 काँग्रेस+ 110 इतर 11छत्तीसगड भाजपा 41 काँग्रेस+ 43 इतर 06

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Rajasthan Assembly Election Resultराजस्थान विधानसभा निवडणूक निकालMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018