शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 8 आमदारांना केलं निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 22:02 IST

काँग्रेस आणि पर्यायानं अहमद पटेलांसाठी अटीतटीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी करणा-या 8 आमदारांना काँग्रेसनं बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

नवी दिल्ली, दि. 9 - काँग्रेस आणि पर्यायानं अहमद पटेलांसाठी अटीतटीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी करणा-या 8 आमदारांना काँग्रेसनं बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गुजरातमधील काँग्रेसच्या 8  बंडखोर आमदारांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या आमदारांचं निलंबन केलं आहे.राज्यसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे आमदारांवर कारवाई केलीय, अशी माहिती गुजरात काँग्रेसचे प्रभारी अशोक गेहलोत यांनी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांत आणखी 6 आमदारांची हकालपट्टी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी पक्षाचा व्हिप झुगारून अहमद पटेलांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान केलं होतं. त्यामुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र अनेक वळणे घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजता निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात अहमद पटेल यांनी 44 मते मिळवत अर्ध्या मताने विजय मिळवला होता. या विजयानंतर अहमद पटेल यांनी ट्विटरवरून सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली होती. "ही निवडणूक माझ्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात अवघड निवडणूक होती. बऱ्याच निवडणुका लढवल्या मात्र एवढे आव्हान कधी मिळाले नव्हते. भाजपाकडून मला पराभूत करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने मला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. त्यांचा यामागे काय हेतू होता हे माहीत नाही." असे अहमद पटेल म्हणाले होते.

काँग्रेस पक्षाकडून निलंबित करण्यात आलेले 8 आमदार हे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांच्या जवळचे समजले जातात. शंकरसिंह वाघेला राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानं काँग्रेसच्या आमदारांची मतं फुटण्याची भीती निर्माण झाली होती.