शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस : संसदीय बोर्डाच्या स्थापनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 05:38 IST

कार्यशैलीवर टीका करणाऱ्यांवर कारवाई नाही; पक्ष प्रवक्त्यांचे संकेत

 शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या कार्यशैलीवर जाहीररीत्या हल्ले व टीका करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा मूड नेतृत्वाचा नाही, असे संकेत सोमवारी पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी दिले.  उल्लेखनीय हे आहे की, गेल्या एक आठवड्यापासून पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल, पी. चिदम्बरम आणि गुलामनबी आझाद यांनी कठोर टीका करून पंचतारांकित संस्कृतीचा उल्लेख करून तळापासून वरपर्यंत निवडणूक घेण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

आझाद यांना विचारले गेले की, ते १९९८ पासून २०१७ पर्यंत नियुक्त झालेले होते.  तरीही आज निवडणुकीची मागणी का करीत आहात? तेव्हा तुम्ही निवडणूक घेऊन पदे भरण्याचा आग्रह का धरला नाही? आझाद यांच्याकडे याचे थेट उत्तर नव्हते; परंतु त्यांनी नरसिंह राव यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करून युक्तिवाद केला की, १९९२ मध्ये मीच संघटनेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती आणि त्यामुळे तिरुपती अधिवेशनात निवडणूक घेतली गेली. ‘लोकमत’ने जेव्हा वरिष्ठ नेत्यांकडे या वादाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ग्रुप २३ च्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, वादाचे मूळ राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे नेतृत्व नाही.  पक्षाच्या कोणत्याही नेत्याला त्यांच्याबद्दल तक्रार नाही, तर सल्लागारांबद्दल आहे. या सल्लागारांना राजकारण समजत नाही. 

ज्येष्ठ नेत्यांना नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये हवा सहभागया नेत्यांचा इशारा के. राजू, रणदीप सुरजेवाला, के.सी. वेणुगोपालसारखे नेते पक्ष चालवत आहेत, याकडे होता. त्यांना पंचतारांकित हॉटेलसह विलासाची संसाधने हवीत. आनंद शर्मा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावर सही केल्यानंतर मौन आहेत; परंतु अनौपचारिक चर्चेत ते मोकळे बोलतात. 

वरिष्ठ नेत्यांना नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये आपला सहभाग असे वाटते. याच कारणामुळे टीका करणारे नेते सामूहिक नेतृत्वाचा विषय काढतात. त्यांची ही मागणी आहे की, संसदीय बोर्डाची स्थापना आणि कार्य समिती सदस्यांची निवडणूक झाल्यास वाद संपेल.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीNew Delhiनवी दिल्ली