शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कोविंद यांच्या भाषणात नेहरूंचा उल्लेख नसल्याने काँग्रेसकडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 14:24 IST

रामनाथ कोविंद यांनी केलेल्या भाषणावर काँग्रेसने आता टीका केली आहे.

ठळक मुद्देरामनाथ कोविंद यांनी केलेल्या भाषणावर काँग्रेसने आता टीका केली आहे.. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडतील असे, विचार मांडल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे कोविंद यांनी आपल्या भाषणात पंडित नेहरूंचा उल्लेख केला नाही. ही गोष्ट दुर्देवी असल्याचं काँग्रेसने म्हंटलं आहे.

नवी दिल्ली, दि. 26- देशाचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यावेळी रामनाथ कोविंद यांनी केलेल्या भाषणावर काँग्रेसने आता टीका केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडतील असे, विचार मांडल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या भाषणात महात्मा गांधी तसंच दिनदयाळ उपाध्याय यांचा उल्लेख केला पण कोविंद यांनी आपल्या भाषणात पंडित नेहरूंचा उल्लेख केला नाही. ही गोष्ट दुर्देवी असल्याचं काँग्रेसने म्हंटलं आहे. बुधवारी राज्यसभेत हा मुद्दा काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पहिल्याच भाषणाचे पडसाद बुधवारी सकाळी राज्यसभेत उमटले. काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली आणि शर्मा यांच्यात शाब्दिक चकमत उडाली. सरकार नियोजीत पद्धतीने काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावं कमी करण्याचा प्रयत्न करते आहे. आनंद शर्मा राष्ट्रपतींच्या भाषणाचा उल्लेख करत म्हणाले,'स्वातंत्र्याच्या काळात नेहरू महान नेते होते. भारताचं पहिलं पंतप्रधान पद त्यांनी भुषविलं आहे. त्यांनी 14 वर्ष इंग्रजांचा तुरूंगवास भोगला आहे. पण आज सरकारकडून नियोजीत पद्धतीने या नेत्यांची नावं न घेण्याचा प्रयत्न होतो आहे, असं खासदार आनंद शर्मा म्हणाले आहेत. तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर टीका केली आहे. 'राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सरदार पटेल आणि आंबेडकर या जवाहरलाल नेहरूंच्या कॅबिनेट मंत्र्यांचा उल्लेख करावा पण देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचं नाव घेऊ नये हे खूप दुर्दैवी आहे. नेहरू फक्त भारताचे पंतप्रधान नव्हते, तर ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची त्यांनी तुलना केली. राष्ट्रपती कोविंद यांनी आता हे ध्यानात घ्यायला हवं की ते आता देशाचे राष्ट्रपती आहेत, भाजपचे सदस्य नाही. त्यांना आता भारताच्या संविधानाचं रक्षण करायचं आहे. त्यांनी पक्षीय राजकारणापलिकडे विचार करायला हवा, असं काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले.

भाषणात काय म्हणाले होते कोविंद ?राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर, आपल्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी प्रयत्न केले होते. सरदार पटेल यांनी संपूर्ण देश एक केला. आपल्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना प्रजासत्ताकाचं महत्त्व पटवून दिलं. वेगाने विकसित होणारी आपली अर्थव्यवस्था आहे. या वेळी सर्वांना संधी देणाऱ्या समाजाची निर्मिती करणं आवश्यक आहे. महात्मा गांधी आणि दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्यापद्धतीने समाजाची कल्पना केली होती. त्यापद्धतीने समाज व्हावा. असा भारत सर्वांना समान संधी देईल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या भाषणात म्हणाले होते. तसंच सुरूवातील कोविंद यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद, राधाकृष्णन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख केला होता.