शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

“८ वर्षे ८ दिशाभूल, भाजपची कमाल, देश उद्ध्वस्त पण मित्र मालामाल”; काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:45 IST

मोदी सरकारला ८ वर्षे झाल्यानिमित्त भाजपकडून जल्लोष केला जात असताना काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.

नवी दिल्ली: केंद्रात भाजपचे मोदी सरकार स्थापन होऊन ८ वर्षे झाली आहेत. भाजपकडून संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला असताना, काँग्रेसने मात्र मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडून मोदी सरकारच्या ८ मोठ्या कामगिरी प्रस्तुत केल्या जात असताना काँग्रेसने मोदी सरकारचे ८ वर्षांचे रिपोर्ट कार्ड सादर केले असून, भाजपने ८ वर्षांत ८ मुद्द्यांवरून जनतेची दिशाभूल केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. 

काँग्रेसचे महासचिव अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. गेल्या ८ वर्षांत भाजपने केलेल्या कमाल कामगिरीमुळे देश उद्ध्वस्त झाला आहे. भाजपच्या धोरणांचा केवळ त्यांच्या मित्रांना मोठा फायदा झाला असून, तेच मालामाल झाले आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. 

अच्छे दिनऐवजी समाजात द्वेष पसरवला गेला

मोदी सरकारने देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि सत्ता काबीज केली. प्रत्यक्षात मात्र तसे घडताना दिसत नाही. देशातील समाजांमध्ये द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याशिवाय काँग्रेसने यावेळी एक पुस्तिकाही प्रकाशित केली आहे. मोदी सरकार आल्यापासून देशातील महागाई वाढतच चालली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. याउलट शेतकऱ्यांसमोर नानाविध अडचणी उभ्या राहिल्याची टीका सुरजेवाला यांनी केली. तसेच आपल्या अपयशांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी नवनवीन मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जात असल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. 

दरम्यान, भाजप सरकार आपल्या फायद्यासाठी करवाढ करत आहेत. आताच्या घडीला देशात ४८ कोटी बेरोजगार असून, ४२ लाख सरकारी रिक्त पदे अद्यापही भरली गेलेली नाहीत. देशाच्या जीडीपीची अवस्था बिकट असून, रुपयाचे अवमूल्यन सुरूच आहे. मोदी सरकारने विमानतळेही विकली. देशात मागील ८ वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या दंगली झाल्याचा मोठा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.  

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण