शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

Congress: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना दिलासा, राजकीय निवृत्तीबाबत पक्षाने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:26 IST

Congress Leader Retirement Age: काँग्रेसने निवृत्तीचे वय ठरवले असते, तर सोनिया गांधी, मलीकार्जून खर्गे, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, दिग्विजय सिंह यांच्यासारख्या नेत्यांवर निवृत्तीची टांगती तलवार आली असती.

नवी दिल्ली: नुकतेच काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. यात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांच्या निवृत्तीचे वय ठरवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण, आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. काँग्रेसकडून नेत्यांच्या निवृत्तीचे वय ठरवले जाणार नाही. पण, आगामी निवडणुकांमध्ये 50 टक्के जागा तरुण नेत्यांना देण्याचा निर्णय झाला आहे. 

पक्षातील अनेक नेत्यांचे वय 65 पेक्षा पुढेपक्षाच्या युवा कार्य समितीने उदयपूर चिंतन शिबिरात 65 वर्षांवरील नेत्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्तीची शिफारस केली होती, मात्र 50 टक्के पदे तरुणांसाठी राखीव झाल्यानंतर हा प्रस्ताव तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या स्वतः 76 वर्षांच्या आहेत. पक्षाचे राज्यसभेतील नेते खर्गे यांचे वय 79 वर्षे आहे. गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी यांच्यासह अनेक नेते म्हातारे झाले आहेत, ज्यांच्यावर निवृत्तीची टांगती तलवार होती. पण, आता मात्र ते सक्रिय राजकारणात राहू शकतात.

पक्षात मोठे बदल होणारआपापल्या राज्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या भूपिंदरसिंग हुड्डा आणि कमलनाथ यांच्यासारख्या नेत्यांनी वयाची 70 वर्षे ओलांडली आहेत. काँग्रेसमध्ये वयाच्या आधारावर निवृत्ती होणार नाही, पण कामगिरीच्या आधारावर पदावरून सक्तीची रजा दिली जाईल, असे शिबीरात ठरवले आहे. दिल्लीत बसून संघटनेचे सरचिटणीस प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेतील आणि चांगले काम करणाऱ्याला बक्षीस मिळेल, पण वाईट काम करणाऱ्या नेत्याला कार्यमुक्त केले जाईल, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. उदयपूर चिंतन शिबिरानंतर पक्षात मोठे बदल होणार असून, त्याअंतर्गत अनेक मोठी पावले उचलली जात आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी