शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
4
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
5
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
6
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
7
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
8
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
9
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
10
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
11
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
12
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
13
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
14
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
15
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
16
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
17
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
18
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
19
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
20
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

निवडणूक आयोगाकडे काँग्रेसची तक्रार

By admin | Updated: February 21, 2017 01:31 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दर्जा अत्यंत खालावत गेला असून आता तो निवडणूक

 शीलेश शर्मा /  नवी दिल्लीविधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दर्जा अत्यंत खालावत गेला असून आता तो निवडणूक आयोगाच्या दारावर धडकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभांमध्ये जी भाषा वापरतात ती सरळसरळ आचारसंहितेचे उल्लंघन आहे, अशी तक्रार काँग्रेसने आयोगाकडे केली आहे. काँग्रेससह इतरही राजकीय पक्षांनी मोदी भाषणांत वापरत असलेल्या भाषेला आक्षेप घेतला आहे. मोदी एका प्रचारसभेत म्हणाले होते की, रमजानमध्ये वीज येते तर ती दिवाळीतही आली पाहिजे, भेदभाव व्हायला नको. आणखी एका प्रचारसभेत ‘गावात कब्रस्तान बनवले जाते तर स्मशानही व्हायला पाहिजे, असे म्हणाले. काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षासह इतर राजकीय पक्षांनी मोदी मतदारांची धार्मिक आधारावर विभागणी व्हावी यासाठी मुद्दाम अशी भाषणे करतात, असा आरोप केला आहे. काँग्रेसची कायदे शाखा निवडणूक आयोगाकडे याबद्दल दाद मागत आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले की, मोदी भाषणात जी भाषा वापरतात त्यामुळे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. ते राजकीय स्वार्थासाठी समाजाला जात, धर्म आणि भाषा या आधारावर विभागू इच्छितात. देशाच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानाने या थराला जाऊन भाषण केलेले नाही.मोदी यांनी अखिलेश, राहुल, मायावती आणि समाजवादी पक्षाचा उल्लेख ‘स्कॅम’ असा केला. त्यांनी त्याची फोड अशी केली. एस म्हणजे समाजवादी पक्ष, सी म्हणजे काँग्रेस, ए म्हणजे अखिलेश आणि एम म्हणजे मायावती. आता हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे. के. सी. मित्तल यांनी या वक्तव्यांची दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.