शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींची 'गांधीगिरी'; 'अवनी वाघिणी'च्या शिकारीवरून टोचले सरकारचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 13:00 IST

यवतमाळमधील अवनी (टी 1) या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. विरोध पक्षांसहीत भाजपाच्या मित्रपक्षांकडूनही अवनी मुद्यावर राजकारण सुरू होऊ लागलं आहे.

नवी दिल्ली - यवतमाळमधील अवनी (टी 1) या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. विरोध पक्षांसहीत भाजपाच्या मित्रपक्षांकडूनही अवनी मुद्यावर राजकारण सुरू होऊ लागलं आहे. मनेका गांधी, शिवसेनेनंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. महात्मा गांधी यांनी मांडलेला विचार ट्विट करत त्यांनी अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकाराचा निषेध राहुल गांधींनी नोंदवला आहे.

''देशात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुन देशाची महानता ठरते, असं महात्मा गांधी यांनी म्हटले होते... #Avni’, असे ट्विट करत त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.  

(अवनीला नाईलाजाने ठार करावं लागलं, मुनगंटीवारांचं मनेका गांधींना प्रत्युत्तर)

दरम्यान, या घटनेचा केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत १३ जणांचा जीव घेणाऱ्या अवनी या नरभक्षी वाघिणीला महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीररित्या ठार मारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केला व कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. शार्प शूटर असगर अली याने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या आदेशावरून अवनीच्या केलेल्या हत्येला मेनका गांधी यांनी पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले. गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये वाघिणीच्या हत्येचे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रामुख्याने उपस्थित केले आहे.

गांधी म्हणाल्या की, वाघिणीला बेशुद्ध करून न पकडता थेट गोळी मारण्यात आली. वाघिणीच्या हत्येचे प्रकरण मी कायदेशीर, गुन्हेगारी व राजकीय प्रश्न म्हणून उपस्थित करील. या वाघिणीला यवतमाळ जिल्ह्यात दोन नोव्हेंबर रोजी गोळी घालून मारण्यात आले. गेल्या दोन वर्षांत अवनी १३ जणांच्या मृत्युला कारण ठरली. दहा महिन्यांपासून दोन बछड्यांची ती काळजी घेत होती. तिला राळेगाव हद्दीतील बोराटी जंगलात शूटर असगर अली याने गोळी घालून मारले. बेकायदा हत्या घडवण्यास असगर अली याचा वापर केला गेला, असे मेनका गांधी यांनी म्हटले. ज्या क्रूररितीने तिला ठार मारण्यात आले त्यामुळे मी खूप दु:खी आहे. अनेक पक्षांनी विरोध करूनही मुनगंटीवार यांनी तिला मारण्याचा आदेश दिला, असेही त्या म्हणाल्या.

नाईलाजाने ठार केलेअवनी’ वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने वन कर्मचाºयांचा जीव वाचविण्यासाठी नाईलाजाने तिला ठार मारावे लागले. मंत्री आणि सचिव मुंबईत मंत्रालयात बसून वनांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करत नाहीत. ते शेतकरी व अदिवासी करतात. त्यांच्यामध्ये खूप असंतोष होता. तो दूर केला नसता तर अखेरीस हेच लोक वन्यजीवांचे शत्रू झाले असते, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.   

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी