शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

४६ वर्षांनंतर बदलला काँग्रेसचा पत्ता, अत्याधुनिक सुविधांनी युक्त नव्या मुख्यालयाचं उद्घाटन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:54 IST

Congress New Headquarter: देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा  २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचं नव्या ठिकाणी स्थलांतर झालं असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचं उदघाटन आज संपन्न झालं आहे.

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा  २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचं नव्या ठिकाणी स्थलांतर झालं असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचं उदघाटन आज संपन्न झालं आहे. आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा नवा पत्ता हा ९-ए कोटला रोड, नवी दिल्ली हा असेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते आज पक्षाच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याह पक्षाचे इतर दिग्गज नेते उपस्थित होते. 

मात्र काँग्रेसच्या मुख्यालयाचं उदघाटन झाल्याझाल्याच त्याच्या नावावरून वादांना सुरुवात झाली आहे. तसेच या वादात भाजपानेही उडी घेतली आहे. काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाची इमारत दीन दयाल उपाध्याय मार्गावर आहे. इथून जवळच काही अंतरावर भाजपाचं कार्यालय आहे. मात्र वैचारिक मतभेदांमुळे काँग्रेसने आपल्या पत्त्यामध्ये दीन दयाय उपाध्याय यांचं नाव येऊ नये यासाठी मुख्यालयाचा मुख्य दरवाजा कोटला मार्गाच्या दिशेने ठेवला आहे. तसेच प्रशासनाकडून पत्ता बदलवून घेत तो ९ ए कोटला मार्ग असा करून घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा पत्ता हा इंदिरा गांधी भवन, ९ए, कोटला मार्ग असा असेल.

दरम्यान, काँग्रेसने आपल्या मुख्यालयाचं नामकरण इंदिरा गांधी यांच्या नावावरून केल्याने काँग्रेसमध्येच काही मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या फलकांमधून या मुख्यालयाचं नामकरण दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावरून करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भाजपानेही डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव काँग्रेसच्या मुख्यालयाला का देण्यात आलेलं नाही, असा सवाल विचारला आहे.

मात्र काँग्रेसकडून हे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी सांगितले की, इंदिरा भवन नावाबाबत मनमोहन सिंग यांचं कुटुंब आणि इतरांनाही आक्षेप नाही आहे. इंदिरा भवन हे नाव सर्वांना मान्य आहे. तर काँग्रेस नेते पवन कुमार बन्सल यांनी सांगितले की, हे नाव १० वर्षांपूर्वीच निश्चित झालं होतं. प्रत्येक गोष्टीवरून वाद उत्पन्न करणं योग्य नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसdelhiदिल्ली