नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यावरून मोदी सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल करताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अटक करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिंमत नाही आणि या दोन्ही पक्षांमध्ये भ्रष्टाचाराची युती आहे, असा आरोप केला.जंतरमंतर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. पंतप्रधानांच्या कथित बनावट डीग्रीच्या मुद्द्यावर केजरीवाल म्हणाले, या दोन्ही पक्षांत साटेलोटे आहे. भाजपा सरकार हेलिकॉप्टरप्रकरणी सोनिया गांधींना अटक करणार नाही आणि काँग्रेस मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा उपस्थित करणार नाही.
‘काँग्रेस-भाजपात भ्रष्टाचार युती’
By admin | Updated: May 8, 2016 01:33 IST