शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस करणार गरिबीवर सर्जिकल स्ट्राइक; राहुल गांधी यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 05:25 IST

देशातील गरिबीवर काँग्रेस सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. गरिबी कायमची नष्ट करण्याच्या योजनेचा आराखडा बनविण्यासाठी काँग्रेस गेल्या सहा महिन्यांपासून काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

जयपूर : देशातील गरिबीवर काँग्रेस सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. गरिबी कायमची नष्ट करण्याच्या योजनेचा आराखडा बनविण्यासाठी काँग्रेस गेल्या सहा महिन्यांपासून काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक गरिबाच्या खात्यात दरमहा ६ हजार रुपये जमा होतीलच असे ते म्हणाले. याचाच अर्थ १२ हजार रुपयांहून कमी मासिक उत्पन्न असणाऱ्यांच्या खात्यात दरमहा ६ हजार रुपये होतीलच.काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी न्यूनतम आय योजना (न्याय योजना) राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली . त्यानंतर आज राजस्थानमधील सुरजगढ येथील सभेत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत फक्त श्रीमंत लोकच भरभराटीची स्वप्ने पाहू शकतात. काँग्रेसच या देशातील गरिबी कायमची नष्ट करेल. न्याय योजना म्हणजे एक प्रकारचा ‘धमाका' असून अशा पद्धतीची ऐतिहासिक योजना आजवर जगातील एकाही देशाने राबविलेली नाही. न्याय योजना लागू झाल्यास भारतात एकही माणूस गरीब राहाणार नाही. राहुल गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही बेकारीचे प्रमाण कमी करण्याचे कसोशीने प्रयत्न करू. जर नरेंद्र मोदी श्रीमंतांनाच पैसे देत असतील, तर काँग्रेस गरीबांना पैसे देईल. ज्यांच्याकडे खूप काळा पैसा आहे अशांनाच मोदी यांनी मदत केली आहे. यूपीए सरकारने ज्यांना दारिद्र्य रेषेखालून वर आणले त्यांनाच पुन्हा गरीब करण्याचे काम गेल्या पाच वर्षांत मोदींनी केले आहे. यूपीए सरकारच्या काळात १४ कोटी लोकांना दारिद्र्याच्या शापातून मुक्त करण्यात आले होते असा दावा त्यांनी केला होता. (वृत्तसंस्था)मोदी अंबानींचे चौकीदारराहुल गांधी म्हणाले की, भारतामध्ये अजूनही २५ कोटी लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. काँग्रेसच्या हाती सत्ता आल्यानंतर प्रत्येकाला योग्य मजुरी व उत्पादनाला रास्त भाव मिळेल. यूपीए सरकारने दहा वर्षांच्या कारकिर्दीत राबविलेल्या योजना मोदींनी बंद केल्या. मनरेगा या मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्या योजनेचे महत्त्व पंतप्रधानांच्या लक्षातच आले नाही. मोदी हे उद्योगपती अनिल अंबानी यांचे चौकीदार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक