शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:05 IST

बंगळुरू : तंत्रज्ञानाने मानवाला मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या; परंतु या सुविधा डोळे झाकून विश्वास ठेवून वापरल्या, तर काय होऊ ...

बंगळुरू : तंत्रज्ञानाने मानवाला मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या; परंतु या सुविधा डोळे झाकून विश्वास ठेवून वापरल्या, तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय नुकताच ‘मेटा’च्या बाबतीत आला. या ऑटो ट्रान्स्लेशन टूलने चक्क कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाच मृत ठरवले आणि एकच गोंधळ उडाला.

त्याचे झाले असे की, ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिव देहाचे सिद्धरामय्या यांनी अंतिम दर्शन घेतले. मुख्यमंत्री कार्यालयाने यावर एक पोस्ट केली. मूळ पोस्ट कन्नड भाषेत होती. ‘मेटा’ने त्याचा सवयीनुसार इंग्रजी भाषेत अनुवाद केला आणि घोटाळा झाला.

जबाबदारीचे भान ठेवा : मुख्यमंत्री सिद्धरामय्याया घडल्या प्रकारानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.जोवर अचूक अनुवाद होत नाही, तोवर कन्नड अनुवादाची ही सुविधा निलंबित ठेवायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.

अनुवाद नेमका कसा? मुख्यमंत्र्यांनी बी. सरोजा देवी यांना श्रद्धांजली अर्पण केल्याची कन्नड पोस्ट इंग्रजीत अनुवादित केली जात असताना त्याची थेट वाक्यरचना अशी गोंधळ माजवणारी होती, ‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे काल निधन झाले.त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतले आणि अंतिम श्रद्धांजली अर्पण केली.’ या वाक्यरचनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती.

सुप्रीम कोर्ट ऑफ कर्नाटकने घोळशुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अनियंत्रित ऑनलाइन घडामोडींमुळे निर्माण झालेल्या धोक्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. सरकारच्या वतीने मेहता यांनी नमूद केले की, ‘सुप्रीम कोर्ट ऑफ कर्नाटक’ नावाने एक बनावट; पण पूर्ण सत्यापित ‘एक्स’ अकाउंट तयार करण्यात आले आहे.

जनतेची दिशाभूल करण्यासाठी या डिजिटल प्लॅटफॉर्मचा कसा गैरवापर केला जाऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.’ सरकारी पातळीवर हे अकाउंट ब्लॉक केल्याविरोधात ‘एक्सने दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी मेहता यांनी हा तर्क मांडला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकFacebookफेसबुक