शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

रेल्वेच्या तिकीट बुकिंगआधीच कन्फर्मेशनची मिळणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 3:13 AM

रेल्वेचे तिकीट घ्यायच्या आधीच कोणत्या गाडीचे तिकीट मिळेल व कोणत्या गाडीचे तिकीट कन्फर्म असेल किंवा वेटिंग तिकीट मिळेल याची माहिती आता प्रवाशांना मिळणार आहे.

संतोष ठाकूरनवी दिल्ली : रेल्वेचे तिकीट घ्यायच्या आधीच कोणत्या गाडीचे तिकीट मिळेल व कोणत्या गाडीचे तिकीट कन्फर्म असेल किंवा वेटिंग तिकीट मिळेल याची माहिती आता प्रवाशांना मिळणार आहे.विमान प्रवासाच्या तिकिटाच्या धर्तीवर रेल्वेदेखील आपली बेवसाइट सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तिकिटांच्या माहितीच्या आधारे तुम्हाला कोणत्या रेल्वेचे तिकीट कन्फर्म असेल किंवा कोणत्या रेल्वेतून तुम्हाला कमी खर्चात प्रवास करता येईल याची माहिती घेता येईल. या सुविधा नव्या वर्षाच्या सुरवातीपासून उपलब्ध व्हाव्यात अशा सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत.गोयल सध्या मुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याआधी त्यांनी सगळे विभागीय महाव्यवस्थापक आणि रेल्वे मंडळाच्या अधिकाºयांची बैठक घेतली होती. तीत त्यांनी वेबसाइट सुरू करण्याचे आदेश दिले होते. गोयल म्हणाले की विमान कंपन्यांसाठी अशी वेबसाइट बनू शकते तर रेल्वेसाठी का नाही? रेल्वेचे अधिकारी त्यांच्याकडील माहितीच्या आधाराने त्या प्रकारची सोय का देऊ शकत नाहीत? बेवसाईटला उशीर झाल्याबद्दल त्यांनी अधिकाºयांना खडसावले.रेल्वे गेल्या पाच वर्षांच्या माहितीचे विश्लेषण या बेवसाइटसाठी करील. कोणत्या महिन्यात कोणत्या रेल्वेला प्रचंड गर्दी असते व कोणत्या वेळी कोणत्या रेल्वेला फार मागणी नसते याची माहिती ते घेतील. कोणत्या वेळेला कोणत्या रेल्वेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होते व कोणत्या रेल्वे गाड्यांत किती तिकिटे कन्फर्म होत नाहीत या आधारे प्रवाशांना कोणत्या रेल्वेचे तिकीट कधी घ्यायचे याची माहिती या वेबसाइटवरून समजेल.कोणत्या रेल्वेचे तिकीट कन्फर्म होण्याची जास्त शक्यता आहे किंवा कोणत्या रेल्वेत त्यांना कोणत्या हंगामात कमी खर्चात तिकीट मिळू शकेल ही माहिती घेता येईल. रेल्वे मंत्रालय आपली संस्था क्रिससह इतर खासगी संस्थांशीही या वेबसाईटबाबत चर्चा करीत आहे.भाडे परत मिळेल : रेल्वेची संस्था आयआरसीटीसीवर भीम अ‍ॅप किंवा युपीआयवरून तिकीट बुक केल्यास प्रवाशांना लकी ड्रॉमध्ये सहभागी करून घेतले जाईल. त्याच्या आधारे दरमहा पाच प्रवाशांना लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांचे पूर्ण भाडे परत केले जाईल. ही योजना सध्या सहा महिन्यांसाठी आहे. गोयल यांच्या आदेशावरून या योजनेसाठी एका प्रवाशाला एका महिन्यात फक्त एक पीआरआर नंबरवर पुरस्कार मिळेल. प्रवाशाला त्याचे भाडे त्याचे भीम अ‍ॅप वा यूपीआय नंबरवरच परत मिळेल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे