शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

Concession On Train Ticket For Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळणार की नाही? रेल्वेमंत्र्यांनी दिलं उत्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 08:51 IST

Concession On Train Ticket For Senior Citizens : देशातील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात 50 ते 55 टक्के सवलत (Concession on Train Ticket) मिळत होती, ती 2 वर्षांपासून बंद आहे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांना  (Senior Citizen) रेल्वे तिकिटांमध्ये (Train Ticket) मिळणाऱ्या सवलतींबाबत अनेक दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. याबाबत सरकारने अद्याप विशेष स्वारस्य दाखवले नव्हते, मात्र रेल्वेमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या उत्तरातून सरकारचा हेतू स्पष्ट झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, सध्या ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात सवलत देण्याची सरकारची कोणतीही योजना नाही.

देशातील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात 50 ते 55 टक्के सवलत (Concession on Train Ticket) मिळत होती, ती 2 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात कोणतीही सूट न देता प्रवास करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान रेल्वेने (Indian Railway) मार्च 2020 मध्ये ही सुविधा पुढे ढकलली होती. तेव्हापासून ही योजना बंद आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासात वाढदरम्यान, कोरोना महामारीनंतरच्या 2 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासात वाढ झाली आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 20 मार्च 2020 ते 31 मार्च 2021 दरम्यान 1.87 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला, तर 1 एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान 4.74 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. मात्र ज्येष्ठ नागरिकांना दिलेली ही सवलत पुन्हा लागू करण्याची कोणतीही योजना नाही.

40 स्थानके विकसित करण्याचे नियोजन याशिवाय, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आदर्श स्थानक योजनेअंतर्गत 1,253 रेल्वे स्थानके चिन्हांकित करण्यात आली आहेत आणि त्यापैकी 1,213 स्थानकांचा आतापर्यंत विकास करण्यात आला आहे. उर्वरित 40 स्थानके 2022-23 या आर्थिक वर्षात विकसित करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, खासदार विष्णू दयाल राम यांच्या प्रश्नाला रेल्वेमंत्र्यांनी लेखी उत्तरात हे उत्तर दिले.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेSenior Citizenज्येष्ठ नागरिक