शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 16:32 IST

कुशल गौडा असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

bengaluru computer science student : बंगळुरुतील एका कॉलेजमधील २१ वर्षीय तरुणाने संतापजनक कृत्य केले. येथील कुंबलगोडूजवळील खासगी कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार घडला. लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावल्याप्रकरणी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्याला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. हे प्रकरण उघड होताच विद्यार्थिनींनी रोष व्यक्त केला. कुशल गौडा असे आरोपीचे नाव असून तो चिक्कगोल्लारहट्टी येथील रहिवासी आहे. कुशल लेडीज टॉयलेटमध्ये लपून बसला होता आणि त्याचा मोबाईल फोन शेजारील टॉयलेटच्या भिंतींच्या मधोमध ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले. इथे सात खोल्या असून, त्यामध्ये प्रत्येक भिंतीमध्ये अंतर आहे.

एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी आरोपी कुशलला रंगेहाथ पकडण्यात आले. टॉयलेटमध्ये गेलेल्या एका मुलीने भिंतीच्या मधोमध ठेवलेला मोबाईल पाहिला आणि तिला गजर ऐकू आला. ती पटकन बाहेर आली आणि तिने टॉयलेटला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर इतरांनी येऊन कुशलला बाहेर ओढून मुख्याध्यापकांच्या दालनात नेले. कॉलेज व्यवस्थापनाकडून तक्रार आल्यानंतर आम्ही त्याला अटक केली आणि मोबाइल फोन जप्त केला. 

आरोपी रंगेहाथ सापडलादरम्यान, कुशलचा फोन तपासला असता जवळपास १५ मिनिटे त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच संबंधित मुलीला सकाळी १०.४५ च्या सुमारास गजर ऐकू आला. म्हणजेच सकाळी १०.३० च्या सुमारास त्याने टॉयलेटमध्ये प्रवेश केला आणि मोबाईल ठेवला. महिलांच्या शौचालयाजवळ बसवलेले सीसीटीव्ही काम करत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी अनेक दिवसांपासून हे कृत्य करत होता. तो चोरुन व्हिडीओ काढत असे. जेव्हा त्याला एका विद्यार्थिनीने रंगेहाथ पकडले तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीचा फोन तपासला असता त्यामध्ये सात-आठ व्हिडीओ सापडल्या. विद्यार्थिनींनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Bengaluruबेंगळूरcollegeमहाविद्यालयcctvसीसीटीव्हीCrime Newsगुन्हेगारी