जनकल्याण पर्जन्यवृष्टीसाठी कम्प्युटर बाबांचा यज्ञयाग
By admin | Updated: September 10, 2015 16:46 IST
नाशिक : जनतेचे कल्याण व्हावे, सुख-समृद्धी नांदावी, शांतता प्रस्थापित व्हावी, तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यांत पर्जन्यवृष्टी होऊन दुष्काळाचे निवारण व्हावे, यासाठी साधुग्राममधील महंत कम्प्युटर बाबा यांच्या खालशात संत-महंतांच्या उपस्थितीत यज्ञयाग तथा हवन करण्यात आले.
जनकल्याण पर्जन्यवृष्टीसाठी कम्प्युटर बाबांचा यज्ञयाग
नाशिक : जनतेचे कल्याण व्हावे, सुख-समृद्धी नांदावी, शांतता प्रस्थापित व्हावी, तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यांत पर्जन्यवृष्टी होऊन दुष्काळाचे निवारण व्हावे, यासाठी साधुग्राममधील महंत कम्प्युटर बाबा यांच्या खालशात संत-महंतांच्या उपस्थितीत यज्ञयाग तथा हवन करण्यात आले.साधुग्राममध्ये सेक्टर दोनमध्ये मध्य प्रदेशातील षट्दर्शन साधू मंडल आखाड्याचे प्रदेशाध्यक्ष कम्प्युटर बाबा यांचा खालसा असून, या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. दुष्काळाच्या निवारणार्थ तसेच पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून अनेक संत-महंतांच्या उपस्थितीत यज्ञ करण्यात आला. विशेष म्हणजे याप्रसंगी उदासीन संन्यासी, वैष्णव, कबीर पंथी आदि सर्व संप्रदायाच्या संत-महंतांनी सहभाग घेतला. यावेळी षट्दर्शन आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत गरीबदास, स्वामी नवीनानंद, दुर्गादास उदासीन, नरसिंहदास, रामायणी महाराज, अवधेशदास, लक्ष्मण मौनी, गोविंददास आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)