शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

सीतेला टेस्ट ट्यूब बेबी बोलणाऱ्या दिनेश शर्मांच्या अडचणी वाढल्या, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 09:50 IST

या विधानाने त्यांच्यासमोरील अडचणी वाढविल्या आहेत.

पाटणा- सीतेचा जन्म टेस्ट ट्युबनं झाल्याचं विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या चांगलचं अंगलट येण्याची शक्यता आहे. या विधानाने त्यांच्यासमोरील अडचणी वाढविल्या आहेत. बिहारमधील सीतेची जन्मभूमी असणाऱ्या सीतामढी जिल्ह्यात मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात दिनेश शर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

स्थानिक वकील ठाकूर चंदन सिंह यांनी शनिवारी सकाळी मुख्य न्याय दंडाधिकारी सरोज कुमारी यांच्या कोर्टात आक्षेप पत्र दाखल केलं. 'दिनेश शर्मा यांनी सीतेवर केलेल्या टिप्पणीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.या विधानातून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो आहे, असं त्यांनी आक्षेप पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, या प्रकरणावर आज सुनावणी होणा आहे. 

नेमकं काय म्हणाले होते दिनेश शर्मा?सीतेचा जन्म मातीच्या भांड्यामध्ये झाला होता. म्हणजेच त्यावेळी टेस्ट ट्युबनं मुलांना जन्म देण्याची पद्धत प्रचलित होती. त्यामुळे सीतेचा जन्मसुद्धा टेस्ट ट्युबनं झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.रामायण काळात माता सीतेचा जन्म एका मातीच्या भांड्यात झाला होता. त्यामुळे रामायण काळापासून टेस्ट ट्युब बेबीची पद्धत अस्तित्वात होती. इतक्यावरच न थांबता महाभारत आणि रामायण काळाचा हवाला देत त्यांनी भगवान नारदमुनी पत्रकार असल्याचंही म्हटलं आहे.